पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारतरत्न महामना पंडित मदन मोहन मालवीयजींना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
25 DEC 2025 10:41AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतरत्न महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. मालवीय हे आयुष्यभर मातृभूमीच्या सेवेसाठी समर्पित राहिले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांनी गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी समाजसुधारणेसोबतच राष्ट्रीय चेतना जागृत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देशाच्या शिक्षण क्षेत्रातील त्यांचे अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
मातृभूमीच्या सेवेसाठी आजीवन समर्पित राहिलेले भारतरत्न महामना पंडित मदन मोहन मालवीयजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली. त्यांनी गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी समाजसुधारणेसोबतच राष्ट्रीय चेतना जागृत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देशाच्या शिक्षण क्षेत्रातील त्यांचे अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही.
* * *
शिल्पा नीलकंठ/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208371)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam