पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह मदत जाहीर

प्रविष्टि तिथि: 25 DEC 2025 10:33AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी या अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थनाही केली आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख रुपये व जखमींना 50 हजार रुपयांची सानुग्रह मदतही पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश वर पोस्ट केले आहे:

"कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अपघातातील जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतो. जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवोत, हीच कामना.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi"

 

* * *

शिल्पा नीलकंठ/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2208368) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam