पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला
दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे ऐतिहासिक भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराची केली घोषणा
दोन्ही राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार, गुंतवणूक, नवोन्मेष आणि परस्परांना सामायिक संधी उपलब्ध करून देण्यात हा मुक्त व्यापार करार एक प्रेरक घटक म्हणून कार्य करेल यावर दोन्ही नेत्यांची सहमती झाली
याशिवाय संरक्षण, क्रीडा, शिक्षण आणि नागरिकांमधील बंध यांसारख्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यात केलेल्या प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले
प्रविष्टि तिथि:
22 DEC 2025 1:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूझीलंडचे पंतप्रधान, ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे ऐतिहासिक, महत्त्वाकांक्षी आणि परस्परांना लाभदायक अशा भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराची घोषणा केली.
न्यूझीलंडचे पंतप्रधान, ख्रिस्तोफर लक्सन यांच्या मार्च 2025 मधील भारत दौऱ्यानंतर या वाटाघाटींविषयी चर्चा सुरु झाली होती, मुक्त व्यापार कराराला केवळ नऊ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत अंतिम रुप मिळाल्याने दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठीची सामायिक महत्त्वाकांक्षा आणि राजकीय इच्छाशक्ती दिसून येते यावर दोन्ही नेत्यांची सहमती झाली. या मुक्त व्यापार करारामुळे द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक खोलवर रुजतील, बाजारपेठेतील प्रवेश सुलभ होईल, गुंतवणुकीच्या निधीचा ओघ वाढेल, दोन्ही राष्ट्रांमधील धोरणात्मक सहकार्य वाढीला लागेल आणि नवोन्मेषक, उद्योजक, शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, विद्यार्थी आणि युवकांना विविध क्षेत्रांमध्ये अपरिमित संधी उपलब्ध होतील.
मुक्त व्यापार कराराने घातलेल्या या मजबूत आणि विश्वसनीय पायामुळे दोन्ही नेत्यांनी येत्या पाच वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याविषयी तसेच येत्या 15 वर्षात न्यूझीलंडकडून भारतात 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी विश्वास व्यक्त केला. याशिवाय संरक्षण, क्रीडा, शिक्षण आणि नागरिकांमधील बंध यांसारख्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याच्या इतर क्षेत्रांमध्ये झालेल्या प्रगतीचेही दोन्ही नेत्यांनी स्वागत केले आणि भारत-न्यूझीलंड भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्यास सहमती दर्शवली.
* * *
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2207346)
आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam