गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे क्रेडाईच्या 'विकसित भारत @ 2047' या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले

प्रविष्टि तिथि: 19 DEC 2025 8:49PM by PIB Mumbai

 

मोदी सरकारच्या पुढील पिढीच्या पायाभूत सुविधांच्या उपक्रमांनी शहरी विकास आणि पायाभूत सुविधांना बळकटी दिली आहे, ज्यामुळे भारतात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आराखडा झाला आहे

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे क्रेडाईच्या ‘विकसित भारत @ 2047’ या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

CR3_5057.JPG

अमित शाह म्हणाले की, क्रेडाईने 20 लाख रोपे लावली आहेत आणि 25 गावांमध्ये 9,000 एकर पडीक जमीन पुनरुज्जीवित करण्याचे काम केले आहे. ते म्हणाले की, प्रत्येक विकासकाने प्रकल्प आरेखित करताना हरित क्षेत्राचा विचार केला पाहिजे. त्यांनी पुढे सांगितले की, जर देशातील प्रत्येक विकासकाने आपल्या प्रत्येक इमारतीच्या बांधकामादरम्यान 10 झाडे लावण्याचा प्रयत्न केला, तर तो एक अत्यंत कौतुकास्पद उपक्रम ठरेल.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, 1999 पासून आजपर्यंत क्रेडाईने गृहनिर्माण आणि अधिवास विकासाला चालना देण्याचे आपले उद्दिष्ट सातत्याने साध्य केले आहे. ते म्हणाले की, क्रेडाईने नेहमीच आचारसंहिता आणि नैतिक पद्धतींना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे आणि क्रेडाईमुळेच आज विकासकांच्या कामाला योग्य श्रेय मिळत आहे.

CR3_4993 (2).JPG

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, 2035 पर्यंत भारतात शहरीकरण सुमारे 40 टक्क्यांपर्यंत वाढेल आणि 2047 पर्यंत देशाची 50 टक्के लोकसंख्या शहरांमध्ये वास्तव्य करेल. ते म्हणाले की, जेव्हा जवळपास निम्मी लोकसंख्या शहरी भागात राहील, तेव्हा घरे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणात विकासकांवर येईल. या जबाबदारीसाठी स्वतःला तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शाह म्हणाले की, वाढत्या शहरीकरणाचा सामना करण्यासाठी शहरी पायाभूत सुविधा आणि शहरी गृहनिर्माण या दोन्हींचा विस्तार होईल. ते म्हणाले की, शहरी गृहनिर्माणामधील संतृप्तता प्रमाण (सॅचुरेशन रेशो) साध्य करण्यासाठी, क्रेडाईने एक संघ तयार करून परवडणाऱ्या, पर्यावरणपूरक आणि चांगल्या जीवनमानासह घरांना प्रोत्साहन देण्यावर विचारमंथन केले पाहिजे. ते म्हणाले की, एक खिडकी मंजुरी, वेळेवर मान्यता, ऑनलाइन ट्रॅकिंग आणि डिजिटाइज्ड नोंदींमुळे या क्षेत्राच्या कार्यप्रणालीवर विश्वास निर्माण झाला आहे आणि या सुधारणा आणखी वेगाने पुढे नेल्या जातील.

CR5_3203 (1).JPG

***

निलिमा चितळे/ संजना चिटणीस/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2206851) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati , Kannada