गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी भारत - ओमान यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे शेतकरी, कारागीर, महिला आणि सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या समृद्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचा विजय असल्याचे काढले गौरवोद्गार
Posted On:
18 DEC 2025 9:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी भारत - ओमान यांच्यातील व्यापक आर्थिक भागीदारी कराराचे स्वागत केले असून शेतकरी, कारागीर, महिला आणि सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या समृद्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचा हा विजय असल्याचे गौरवोद्गार काढले आहेत.
एक्स समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये अमित शाह यांनी म्हटले आहे : शेतकरी, कारागीर, महिला आणि सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या समृद्धीसाठीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचा हा विजय आहे. भारत-ओमान व्यापक आर्थिक भागीदारी करार हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्या कष्टकरी नागरिकांसाठी आणि उद्योगांसाठी नवीन संधी उपलब्ध करणाऱ्या या करारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आपल्या व्यापारउदीमातील मुत्सद्देगिरीत आलेल्या बदलाची साक्ष दिसून येते आणि या जागतिक वाटाघाटींमध्ये जनसामान्यांचे हित केंद्रस्थानी आहे, हे अधोरेखित होते.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2206302)
अभ्यागत कक्ष : 31