गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान,'द फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ ओमान'ने सन्मानित करण्यात आल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी त्यांचे केले अभिनंदन


पंतप्रधान मोदी यांना सलग प्राप्त होणारे सन्मान 140 कोटी भारतीयांच्या सामर्थ्याचे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक परिवर्तित राष्ट्र म्हणून भारताच्या उदयाचे प्रतीक

प्रविष्टि तिथि: 18 DEC 2025 8:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान, 'द फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ ओमान'ने सन्मानित करण्यात आल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी X या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये लिहिले आहे, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘द फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान होणे, हे त्यांचे  कुशल नेतृत्व  आणि जागतिक नेते म्हणून त्यांच्या स्वीकाराची पावती आहे. आपले पंतप्रधान मोदीजी यांना सातत्याने प्राप्त होणारे सन्मान140 कोटी भारतीयांच्या सामर्थ्याचे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक परिवर्तित राष्ट्र म्हणून भारताच्या उदयाचे प्रतीक आहे.”

निलीमा चितळे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2206279) आगंतुक पटल : 65
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Telugu , Kannada , Malayalam