गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे नामवंत शिल्पकार राम सुतार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले
राम सुतार यांच्या निधनामुळे भारतीय कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे
प्रविष्टि तिथि:
18 DEC 2025 4:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे नामवंत शिल्पकार राम सुतार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की स्टॅच्यू ऑफ युनिटीचे रचनाकार नामवंत महान शिल्पकार राम सुतार जी यांचे निधन अतिशय दुःखदायक आहे. ते म्हणाले की युवा पिढीसाठी भारतीय संस्कृती आणि वारसा संस्मरणीय बनवण्यासाठी ज्यांनी ऐतिहासिक शिल्पांची निर्मिती केली त्या राम सुतार यांनी अजिंठा आणि एलोरा येथील शिल्पांच्या जीर्णोद्धारा मध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनामुळे भारतीय कला विश्वाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, असे शाह म्हणाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती शांती शांती.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2205958)
आगंतुक पटल : 10