पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

इथिओपियाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली यांच्यासोबत प्रतिनिधीस्तरीय चर्चेदरम्यान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे भाषण

प्रविष्टि तिथि: 16 DEC 2025 10:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025

महामहिम, माझ्या बंधूंनो आणि मित्रांनो,

इथियोपियाला भेट देत असल्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. इथियोपियाची ही माझी पहिलीच भेट आहे. मात्र येथे पाऊल टाकताच आपुलकीची आणि आत्मीयतेची तीव्र अनुभूती मला मिळाली. भारत आणि इथियोपिया यांच्यात हजारो वर्षांपासून सातत्याने संपर्क, संवाद आणि आदान-प्रदान होत आले आहे. अनेक भाषा आणि समृद्ध परंपरांनी संपन्न असलेले आपले दोन्ही देश ‘विविधतेत एकता’चे प्रतीक आहेत. दोन्ही देश शांतता आणि मानव कल्याणासाठी कटिबद्ध लोकशाही शक्ती आहेत. आपण ग्लोबल साउथचे सहप्रवासीही आहोत आणि भागीदारही आहोत. आंतरराष्ट्रीय मंचांवरही आपण खांद्याला खांदा लावून उभे राहिलो आहोत.

अफ्रिकन युनियनचे इथियोपियामध्ये मुख्यालय असणे, इथियोपियाला आफ्रिकन कूटनीतीचे एक महत्त्वपूर्ण भेटीचे केंद्र बनवत आहे. समावेशक विश्वाच्या- ‘इन्क्लूसिव वर्ल्ड’ या सामायिक दृष्टीकोनातून प्रेरित होऊन भारताने 2023 मध्ये आफ्रिकन युनियनला जी-20 चे सदस्यत्व मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व बाबी लक्षात घेऊन आज आपण भारत–इथियोपिया संबंधांना ‘धोरणात्मक भागिदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेत आहोत. हा उपक्रम आमच्या संबंधांमध्ये नवी ऊर्जा, नवे बळ आणि अधिक दृढता निर्माण करेल. भविष्यातील अपार संधी प्रत्यक्षात आणण्यासाठी एक स्पष्ट आराखडा तयार केला जाईल. आज अर्थव्यवस्था, नवोन्मेष, तंत्रज्ञान, संरक्षण, आरोग्य, क्षमता-विकास आणि बहुपक्षीय सहकार्य अशा आपल्या सहकार्याच्या प्रमुख आयामांवर विचारमंथन करण्याची संधी मिळाली. इथियोपियाच्या विद्यार्थ्यांसाठी भारतात शिष्यवृत्ती दुप्पट करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे, याचा मला विशेष आनंद आहे.

महामहिम,

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत व्यक्त केलेल्या आपल्या संवेदनांसाठी तसेच दहशतवादाविरुद्धच्या आमच्या लढ्यात दिलेल्या आपल्या पाठिंब्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. दहशतवादाविरुद्धच्या या संघर्षात मित्र देशांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा, माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे इतके भव्य स्वागत केल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो.

नितीन फुल्लुके /राज दळेकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2205335) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Punjabi , Gujarati