वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
दूरदृष्टी आणि अथक अंमलबजावणीने भारताच्या ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवले: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2025 7:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, यांनी आज नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, गेल्या 11 वर्षांतील भारताच्या ऊर्जा क्षेत्राचा प्रवास या गोष्टीचा पुरावा आहे की, दूरदृष्टी, प्रामाणिक हेतू आणि अथक अंमलबजावणी एका राष्ट्राचे भविष्य बदलू शकते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त, गोयल म्हणाले की, देश केवळ भारताच्या लोहपुरुषाचेच नाही, तर एका अशा दूरदृष्टीच्या नेत्याचे स्मरण करत आहे ज्यांना देशाला राजकीय, आर्थिक आणि सामरिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे झालेले पहायचे होते. मंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भरतेची तीच भावना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात साकार झाली आहे. त्यांनी नमूद केले की, सन 2024-25 या आर्थिक वर्षात देशाने 1048 दशलक्ष टनांचे सर्वाधिक कोळसा उत्पादन नोंदवले, तर कोळशाची आयात सुमारे 8 टक्क्यांनी कमी झाली. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या 11 वर्षांत भारताची सौर ऊर्जा क्षमता 46 पटीने वाढली आहे, ज्यामुळे देश जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर पवन ऊर्जेची क्षमता 2014 मधील 21 गिगावॉटवरून 2025 मध्ये 53 गिगावॉटपर्यंत वाढली आहे. गोयल यांनी पुढे सांगितले की, भारत जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे तेल शुद्धीकरण केंद्र म्हणून उदयास आला आहे आणि त्याची शुद्धीकरण क्षमता 20 टक्क्यांनी वाढवण्यासाठी काम करत आहे.
देशाने अतिरिक्त वीज निर्मिती, ग्रीड एकत्रीकरण आणि नवीकरणीय ऊर्जेतील नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल केली आहे, असे गोयल म्हणाले. हे परिवर्तन योगायोगाने झालेले नाही, तर ते स्पष्ट दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी प्रेरित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताने वीज टंचाईतून वीज सुरक्षितता आणि आता वीज शाश्वततेच्या दिशेने वाटचाल केली आहे, असे त्यांनी सांगितले.
गोयल म्हणाले की, 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी रणनीती पुन्हा निश्चित केली जात आहे. गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की, जेव्हा भारत विकसित भारत 2047 च्या दिशेने कूच करेल, तेव्हा देशाचे ऊर्जा क्षेत्र प्रमाण, वेग आणि शाश्वतता यांचे एकत्रित व्यवस्थापन करण्यासाठी एक जागतिक अभ्यास विषय म्हणून उदयास येईल.
सुषमा काणे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2204283)
आगंतुक पटल : 12