पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांच्या 75व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन


सरदार पटेल यांचे जीवन आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी एक विशेष प्रेरणा देत राहील

सरदार पटेलांनी देशवासियांमध्ये रुजवलेली राष्ट्रीय एकतेची भावना ही 'विकसित भारता'साठी ऊर्जेचा स्रोत आहे: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 15 DEC 2025 8:44AM by PIB Mumbai

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 75 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना  विनम्र आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, सरदार पटेलांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाला एकसंध करण्यासाठी आणि भारताला एकतेच्या सूत्रात गुंफण्यासाठी समर्पित केले.

एकात्म आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी सरदार पटेलांचे अतुलनीय योगदान समस्त देशवासियांच्या स्मरणात सदैव कोरलेले राहील, असे  मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी असेही म्हटले की, 'आत्मनिर्भर भारता'च्या उभारणीसाठी सरदार पटेलांचे जीवन आजही विशेष प्रेरणा देत आहे. भारताच्या या लोहपुरुषाने रुजवलेली राष्ट्रीय एकतेची भावना 'विकसित भारता'च्या संकल्पनेसाठी ऊर्जेचा एक शक्तिशाली स्रोत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रनिर्मितीतील सरदार पटेलांचे अतुलनीय योगदान, त्यांचे निर्णायक नेतृत्व आणि भारताची अखंडता बळकट करण्यासाठीची  त्यांची कटिबद्धता, एका सशक्त आणि समर्थ राष्ट्रासाठी सदैव मार्गदर्शक ठरेल, असे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले.

एक्सवरील स्वतंत्र पोस्ट्समध्ये मोदी यांनी नमूद केलेः

“ लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या 75व्या पुण्यतिथी दिनी माझे सादर नमन. त्यांनी देशाला एका सूत्रात गुंफण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. एकसंध आणि सशक्त भारतवर्षाच्या निर्मितीमध्ये त्यांचे अतुलनीय योगदान हे कृतज्ञ राष्ट्र कधीही विसरणार नाही.”

“भारत रत्न सरदार पटेल यांची 75वीं पुण्यतिथी आत्मनिर्भर भारतासाठी  प्रेरणा घेण्यासाठी एक विशेष प्रसंग देखील आहे. त्यांनी देशवासियांमध्ये राष्ट्रीय एकतेची जी भावना रुजवली, ती ‘विकसित भारत’ साठी ऊर्जेचा स्रोत आहे. राष्ट्र निर्मितीमध्ये त्यांची अद्वितीय भूमिका सशक्त आणि सामर्थ्यवान भारतासाठी मार्गदर्शक बनेल.”

***

NehaKulkarni/ShileshPatil/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2203930) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Bengali-TR , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam