पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थिरू रजनीकांत यांना त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2025 8:59AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरू रजनीकांत यांना त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
रजनीकांत यांच्या अभिनयाने पिढ्यान्पिढ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे आणि त्यांना व्यापक प्रशंसा मिळवून दिली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. विविध भूमिका, प्रकार आणि सिनेमॅटिक शैलींमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीने भारतीय चित्रपटसृष्टीत सतत नवे मापदंड निर्माण केले आहेत, असेही ते म्हणाले.
हा वर्ष विशेष आहे कारण थिरू रजनीकांत चित्रपटसृष्टीत ५० गौरवशाली वर्षे पूर्ण करत आहेत—हा टप्पा त्यांच्या टिकून राहिलेल्या प्रभावाचा आणि उद्योगातील अतुलनीय योगदानाचा पुरावा आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी थिरू रजनीकांत यांच्या दीर्घ, निरोगी आणि समाधानकारक आयुष्यासाठी प्रार्थना केली.
एक्स या समाज माध्यमावरच्या स्वतंत्र पोस्टमध्ये, पंतप्रधान मोदी म्हणाले:
“थिरू रजनीकांत यांना त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या अभिनयाने अनेक पिढ्यांना भुरळ घातली आहे आणि त्यांना व्यापक प्रशंसा प्राप्त करून दिली आहे. त्यांच्या कामाचा आवाका विविध भूमिका आणि प्रकारांमध्ये असून, तो नेहमीच नवे मापदंड स्थापित करणारा ठरला आहे. हे वर्ष विशेष आहे कारण त्यांनी चित्रपटसृष्टीतील 50 वर्षांचा उल्लेखनीय प्रवास पूर्ण केला आहे. त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो.”
“திரு ரஜினிகாந்த் அவர்களின் 75-வது பிறந்தநாள் எனும் சிறப்பான தருணத்தில் அவருக்கு வாழ்த்துகள். அவரது நடிப்பாற்றல் பல தலைமுறைகளைக் கவர்ந்துள்ளது; பரவலான பாராட்டைப் பெற்றுள்ளது. அவரது திரையுலகப் படைப்புகள் பல்வேறு பாத்திரங்கள் மற்றும் பாணிகளில் பரவி, தொடர்ச்சியான முத்திரைகளைப் பதித்துள்ளன. திரைப்பட உலகில் அவர் 50 ஆண்டுகளை நிறைவு செய்திருப்பது இந்த ஆண்டின் குறிப்பிடத்தக்க அம்சமாகும். அவரது நீண்டகால, ஆரோக்கியமான வாழ்க்கைக்காகப் பிரார்த்திக்கிறேன்.”
***
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2202787)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada