पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते दमणमध्ये ‘नमो पथ’, देवका सीफ्रंटचे लोकार्पण

प्रविष्टि तिथि: 25 APR 2023 10:00PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दमण येथे नमो पथ, देवका सीफ्रंट चे लोकार्पण केले. कार्यक्रमस्थळी आल्यानंतर पंतप्रधानांनी बांधकाम कामगारांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत  छायाचित्र काढले. त्यांनी ‘नया भारत सेल्फी पॉइंट’लाही भेट दिली.

सुमारे 165 कोटी रुपये खर्चाचा 5.45 किमी लांबीचा देवका सीफ्रंट हा देशातील अशा प्रकारचा एकमेव किनारी मार्ग आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि या ठिकाणी  अधिक पर्यटक आकर्षित होतील, तसेच ते विश्रांती आणि मनोरंजनाच्या उपक्रमांचे केंद्र बनेल अशी अपेक्षा आहे. सीफ्रंटला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात आले असून, या ठिकाणी स्मार्ट लाइटिंग, पार्किंग सुविधा, उद्याने, फूड स्टॉल्स, मनोरंजनासाठी जागा आणि भविष्यात ‘लक्झरी टेंट सिटीज’ उभारण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे.

दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यावेळी पंतप्रधानांबरोबर होते.

***

NitinFulluke/RajshreeAgashe/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2201436) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam , Malayalam