जलशक्ती मंत्रालय
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या हस्ते जल शक्ती हॅकेथॉन 2025 चा प्रारंभ
प्रविष्टि तिथि:
09 DEC 2025 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत श्रमशक्ती भवन येथे ‘जल शक्ती हॅकेथॉन-2025’ आणि भारत-विन पोर्टलचे उद्घाटन झाले. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असून भारताच्या जलक्षेत्रात वैज्ञानिक आणि तांत्रिक उपाययोजनांवर भर देण्याविषयीच्या त्यांच्या जल दृष्टिकोन @2047 या संकल्पनेवर आधारित आहे.
जल शक्ती हॅकेथॉन 2025 ही केवळ एक स्पर्धा नाही तर राष्ट्रीय चळवळ असून पाण्याविषयी सुरक्षित, सर्वसमावेशक आणि तंत्रज्ञानावर आधारित भविष्याच्या निर्मितीसाठी देशाच्या सामूहिक प्रतिभेचा सुयोग्य वापर करण्यासाठी त्याची रचना केली आहे, असे सी.आर. पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रीय सहभाग वृद्धिंगत करणारा एक सार्वजनिक कल्याणकारी उपक्रम
जल क्षेत्रातील नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि ते खरोखरच सार्वजनिक हिताचे बनवणे असा या हॅकेथॉनचा उद्देश असून यात सर्व भागधारक सहभागी होऊ शकतात. यामध्ये संपूर्ण सरकार आणि संपूर्ण समाज (जन भागिदारी) या दृष्टिकोनाचा अंगीकार केला असून त्यामुळे नागरिक, संशोधक, उद्योग आणि नवोन्मेषकांचा व्यापक सहभाग शक्य होतो.
हे पोर्टल “https://bharatwin.mowr.gov.in या संकेतस्थळावर असून राष्ट्रीय प्लॅटफॉर्म BHARAT–WIN (जल नवोन्मेष नेटवर्क) चा एक भाग आहे. पाण्याशी संबंधित तळापर्यंतच्या आव्हानांवर व्यावहारिक, अधिक विस्ताराने आणि प्रत्यक्ष लागू करता येतील अशा उपायांना प्रोत्साहन देणे हे यामागील उद्दिष्ट आहे. यामध्ये कृषी स्तरीय जलसंधारण, ग्रामीण भागातील पाण्याची गुणवत्ता, स्मार्ट देखरेख, पारंपारिक जल पद्धतींचे पुनरुज्जीवन, पूर आणि दुष्काळ व्यवस्थापन यांचा समावेश आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून जल क्षेत्राशी संबंधित संशोधन केवळ काही संस्थांपुरते मर्यादित न ठेवता यामध्ये स्टार्ट अप्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, उद्योगजगत, शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्था, प्रयोगशाळा, इन्क्युबेटर्स, युवा नवोन्मेषक, ग्रामीण भागातील महिला आणि युवक, खाजगी क्षेत्र आणि आंतरराष्ट्रीय संस्था या सर्व संबंधितांचा व्यापक सहभाग अपेक्षित आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये
· नियमित अंतराने हॅकेथॉनचे आयोजन आणि राष्ट्रीय जल प्राधान्यांवरील प्रस्ताव मागवणे.
· पारदर्शक सादरीकरण, मूल्यांकन आणि कल्पनांचा मागोवा घेण्याची हमी .
· स्टार्टअप्स, एमएसएमई, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि एनईआर आणि महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांमधील नवोन्मेषकांना सहभाग घेण्यासाठी प्रवृत्त करणे .
· जन भागिदारीच्या माध्यमातून सहयोगी नवोपक्रमांना समर्थन देणे.
‘जल क्षेत्रातील संशोधन आणि विकास कार्यक्रम तसेच राष्ट्रीय जल अभियानाची अंमलबजावणी’या योजनेअंतर्गत, जलसंपदा विभाग, नदी विकास आणि गंगा संरक्षण तसेच जलशक्ती मंत्रालय निवडलेल्या नवकल्पनांसाठी अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य प्रदान केलं जाणार आहे.
हॅकेथॉन विजेत्यांना प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट (पीओसी) विकसित करण्यासाठी 1 लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. प्राधान्य क्षेत्रांमध्ये जलसंपत्ती व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, पाणी वापर कार्यक्षमता, वर्तुळाकार अर्थव्यवस्था, हवामान लवचिकता, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि स्मार्ट वॉटर ग्रिड, तंत्रज्ञान आधारित शेती, पावसाच्या पाण्याची साठवणूक, नदी-खोरे आणि पूर व्यवस्थापन आणि जलविज्ञान प्रत्युष इत्यादींचा समावेश आहे.



निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201059)
आगंतुक पटल : 16