शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

9 व्या परीक्षा पे चर्चा (पीपीसी 2026) उपक्रमाचे जानेवारी 2026 मध्ये आयोजन


MyGov पोर्टलवर 11 जानेवारी 2026 पर्यंत नावनोंदणी करता येणार

प्रविष्टि तिथि: 06 DEC 2025 12:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 06 डिसेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा (पीपीसी) या अभिनव संवादात्मक कार्यक्रमाच्या 9 व्या आवृत्तीचे पुन्हा एकदा जानेवारी 2026 मध्ये आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातील तसेच परदेशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक त्यांच्याशी परीक्षेमुळे येणारा ताण दूर करून परीक्षेचा काळ उत्सवाच्या रुपात जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून कसा साजरा करता येईल याबद्दल चर्चा करतात.

या कार्यक्रमातील सहभागींची निवड करण्यासाठी, 1 डिसेंबर 2025 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत MyGov पोर्टलवर (https://innovateindia1.mygov.in/ ) ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आहे. शिक्षक आणि पालकांसोबतच इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याची मुभा आहे. हा उपक्रम पूर्ण करणाऱ्या सर्व नोंदणीकृत सहभागींना MyGov कडून सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

परीक्षा पे चर्चा च्या 8 व्या आवृत्तीचे 10 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसारण करण्यात आले. हा संवाद नवी दिल्लीतील सुंदर नर्सरीमध्ये नाविन्यपूर्ण स्वरूपात आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारी शाळा, केंद्रीय विद्यालये, सैनिक शाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा, सीबीएसई शाळा आणि नवोदय विद्यालयांचे प्रतिनिधित्व करणारे 36 विद्यार्थी एकत्र आले होते. प्रेरणाचे माजी विद्यार्थी आणि कला उत्सव आणि वीर गाथेचे विजेते देखील त्यामध्ये सहभागी झाले होते. या आवृत्तीत क्रीडा आणि शिस्त तसेच मानसिक आरोग्यापासून ते पोषण, तंत्रज्ञान आणि वित्त आणि सर्जनशीलता आणि सकारात्मकता असे सात स्वतंत्र विभाग होते, त्यामध्ये प्रसिद्ध व्यक्तींमार्फत त्यांना प्रेरणादायी विचार  देण्यात आले.

2025 मध्ये झालेल्या 'परीक्षा पे चर्चा' ने 245 हून अधिक देशांमधील विद्यार्थी, 153 देशांमधील शिक्षक आणि 149 देशांमधील पालकांच्या सहभागासह उल्लेखनीय गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. 2018 मध्ये पहिल्या आवृत्तीत केवळ 22,000 जणांच्या सहभागापासून होता ते 2025 मधील आठव्या आवृत्तीसाठी 3.56 कोटी जणांनी नावनोंदणी करण्यापर्यंत वाढलेला प्रतिसाद - ही या कार्यक्रमाची प्रासंगिकता आणि पर्यायाने वाढत्या लोकप्रियतेचा स्पष्ट पुरावा आहे. याव्यतिरिक्त, पीपीसी 2025 शी संबंधित देशव्यापी जनआंदोलन उपक्रमांमध्ये 1.55 कोटी लोकांनी भाग घेतला, त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची एकूण संख्या जवळपास 5 कोटींवर पोहोचली.

***

नेहा कुलकर्णी/मंजिरी गानू/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2199797) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil