रेल्वे मंत्रालय
कवच 4.0 ची सुरुवात 738 रूट किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गावर झाली आहे, त्यात दिल्ली ते मुंबई मार्गावरील पलवल - मथुरा- नागदा हा 633 रूट किलोमीटरचा आणि दिल्ली ते हावडा मार्गावरील हावडा- बर्धमान हा 105 रूट किलोमीटर चा भाग समाविष्ट
प्रविष्टि तिथि:
05 DEC 2025 2:31PM by PIB Mumbai
कवच ही स्वदेशात विकसित झालेली एक स्वयंचलित रेल्वेगाडी सुरक्षा यंत्रणा ( ATP) आहे.
लोको पायलट्सना रेल्वे गाड्या चालवताना वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच आणीबाणीच्या वेळी लोको पायलट ब्रेक लावू न शकल्यास स्वयंचलित ब्रेक कार्यान्वित करण्यासाठी, शिवाय वाईट हवामानातदेखील सुरक्षित रेल्वे चालवण्यासाठी कवच यंत्रणा मदत करते.
सखोल परीक्षण व चाचण्यांनंतर कवच 4.0 ची सुरुवात 738 रूट किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गावर झाली आहे, त्यात दिल्ली ते मुंबई मार्गावरील पलवल - मथुरा- नागदा हा 633 रूट किलोमीटरचा आणि दिल्ली ते हावडा मार्गावरील हावडा- बर्धमान हा 105 रूट किलोमीटरचा भाग समाविष्ट आहे.
दिल्ली - मथुरा व दिल्ली -हावडा मार्गिकांवरील उरलेल्या भागातही कवच यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सुरु आहे.
दिल्ली-मुंबई व दिल्ली - हावडा या जास्त वाहतुकीच्या मार्गांवर कवच यंत्रणेचे महत्वाचे भाग कार्यान्वित करण्यातील प्रगती खालीलप्रमाणे :
याशिवाय रेल्वेमार्गाच्या आजूबाजूला कवच यंत्रणा बसवण्याचे काम 15,512 रूट किमी मार्गावर सुरु असून त्यात GQ,GD, HDN आणि भारतीय रेल्वेच्या इतर भागांचा समावेश आहे.
कवच 4.0 यंत्रणा आणखी 9,069 रेल्वेगाड्यांमध्ये बसवण्याच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. सर्व रेल्वेगाड्यांमध्ये टप्प्याटप्प्याने कवच यंत्रणा बसवण्याचे काम सुरु आहे.
सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कवचसाठी विशेष प्रशिक्षण देण्याचे काम भारतीय रेल्वेच्या केंद्रीकृत प्रशिक्षण संस्था करत आहेत. आतापर्यंत 40,000 तंत्रज्ञ, चालक व अभियंत्यांना कवच तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले गेले आहे. यामध्ये 30,000 लोको पायलट व सहाय्य्क लोको पायलट्सचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांची आखणी IRISET च्या सहकार्याने केली गेली आहे.
कवच यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ऑक्टोबर 2025 पर्यंत रु 2354.36 कोटी खर्च झाले आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 साठी रु 1673.19 कोटी ची तरतूद करण्यात आली आहे. कामाची जसजशी प्रगती होते तसतसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
ही माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.
***
सोनाली काकडे/उमा रायकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2199618)
आगंतुक पटल : 3