वस्त्रोद्योग मंत्रालय
हस्तकला पुरस्कार 2025: हस्तकला क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 9 डिसेंबर 2025 रोजी हस्तकला पुरस्कारांचे होणार वितरण.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री, गिरीराज सिंह आणि वस्त्रोद्योग आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री, पाबित्रा मार्गारिटा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
उत्कृष्ट कारागिरांना शिल्प गुरु आणि राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातील
प्रविष्टि तिथि:
05 DEC 2025 11:02AM by PIB Mumbai
वस्त्रोद्योग मंत्रालय 2023 आणि 2024 या वर्षांसाठी प्रतिष्ठेच्या हस्तकला पुरस्कारांची अतिशय अभिमानाने घोषणा करत आहे. हे पुरस्कार उल्लेखनीय कुशल कारागिरांचा सन्मान करण्यासाठी प्रदान केले जात आहेत.
पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी, 9 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम राष्ट्रीय हस्तकला सप्ताह सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. हे प्रतिष्ठेचे राष्ट्रीय सन्मान अतुलनीय कलात्मक उत्कृष्टतेचा बहुमान करतात आणि देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हस्तकलेच्या वारशाची जोपासना करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या अढळ वचनबद्धतेची पुष्टी करतात.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. तर सन्माननीय अतिथी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आणि केंद्रीय वस्त्रोद्योग आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.
1965 मध्ये प्रारंभ झाल्यापासून राष्ट्रीय हस्तकला पुरस्कारांनी, देशाच्या सांस्कृतिक परिदृश्याला अद्वितीय कुशल कारागिरीने समृद्ध करणाऱ्या असामान्य कारागिरांचा बहुमान केला आहे. 2002 मध्ये सुरू झालेले शिल्प गुरु पुरस्कार भारतीय हस्तकला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहेत. हे पुरस्कार ज्या कारागिरांनी त्यांच्या कलेत उत्कृष्ट प्रभुत्व आणि नवोन्मेषाचे दर्शन घडवले आहे, ज्यामुळे भारताच्या वैविध्यपूर्ण हस्तकला वारशाची शाश्वतता आणि उत्क्रांती सुनिश्चित झाली आहे अशा कारागिरांचा गौरव करतात.
दरवर्षी 8 ते 14 डिसेंबर दरम्यान साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय हस्तकला सप्ताहाच्या माध्यमातून, भारतातील कारागिरांच्या कलेला अभिवादन करण्यात येते आणि हस्तकलेच्या चिरस्थायी सांस्कृतिक महत्त्वाचा उत्सव साजरा केला जातो. या सप्ताहात जागरूकता वाढवणे, कारागिरांच्या उपजीविकेला बळकटी देणे आणि समकालीन भारतात या क्षेत्राचे सामाजिक-आर्थिक महत्त्व वाढवणे यासाठी विविध उपक्रम आणि सार्वजनिक सहभाग कार्यक्रम आयोजित केले जातात. महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कारागिरी दर्शवणारी प्रदर्शने, विषय-आधारित कार्यशाळा, क्षमता-निर्माण कार्यक्रम, हस्तकला प्रात्यक्षिके, पॅनेल चर्चा, संपर्क वाढवण्याचे उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश आहे.
List of Awardees
Program Schedule for the Handicraft Week 2025 (8th-14th Dec 2025)
***
सोनाली काकडे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2199474)
आगंतुक पटल : 24