पंतप्रधान कार्यालय
स्वराज कौशल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
04 DEC 2025 5:55PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज कौशल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. स्वराज कौशल यांनी विधिज्ञ म्हणून स्वतःची उल्लेखनीय ओळख निर्माण केली आणि वंचित- दुर्बलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी कायद्याच्या व्यवसायाचा उपयोग करण्यावर त्यांनी सदैव भर दिला, असे मोदी म्हणाले. कौशल हे भारताचे सर्वांत तरुण राज्यपाल झाले आणि त्यांच्या राज्यपालपदाच्या कार्यकाळात मिझोरममधील जनतेवर त्यांनी अमिट छाप सोडली, असे मोदी पुढे म्हणाले. एक खासदार म्हणून त्यांचे विचार आणि मार्गदर्शनही अत्यंत महत्त्वपूर्ण होते.
पंतप्रधानांनी ‘एक्स या सामाजिक माध्यमावरील एका संदेशातर म्हटले आहे की,
स्वराज कौशल यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. ते एक प्रख्यात विधीज्ञ होते आणि वंचित व दुर्बल घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कायदे व्यवसायाचा उपयोग व्हावा, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. देशाचे सर्वांत तरुण राज्यपाल म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आणि मिझोरमच्या लोकांच्या मनावर आपल्या कार्यातून छाप सोडली. संसद सदस्य म्हणून त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणांनीही नेहमीच लक्ष वेधले. या दुःखद प्रसंगी त्यांची कन्या बांसुरी आणि कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.
***
सुषमा काणे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2199034)
आगंतुक पटल : 4