पंतप्रधान कार्यालय
चित्ता पुनर्वसन उपक्रमामुळे दिसून येणाऱ्या देशाच्या वन्यजीव संवर्धनातील कटिबद्धतेविषयीचा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
04 DEC 2025 2:34PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘चित्ता पुनर्वसन उपक्रम हा आपल्या देशाच्या वन्यजीव संरक्षणातील कटिबद्धतेचे प्रतीक ठरतो आहे, या विषयावरील केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे. देशात चित्त्यांची वाढणारी संख्या अत्यंत उत्साहदायी आहे, असे मोदी म्हणाले. देशात जन्मलेल्या मादी चित्त्याने पाच पिल्लांना जन्म देणे हे चित्त्यांनी भारतीय परिस्थितींशी पूर्णपणे जुळवून घेतल्याचे ठोस निदर्शक आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या लेखाला उत्तर देताना मोदी म्हणाले :
देशात चित्त्यांची वाढती संख्या अत्यंत उत्साहदायी आहे. भारतातच जन्मलेल्या मादी चित्त्याने पाच पिल्लांना जन्म दिला, ही बाब चित्यांनी भारतीय परिस्थितींशी पूर्णपणे जुळवून घेतल्याचे ठोस निदर्शक आहे. केंद्रीय मंत्री @byadavbjp यांनी आपल्या लेखामध्ये चित्ता पुनर्वसन कार्यक्रम हा आपल्या वन्यजीव संवर्धनातील दृढ वचनबद्धतेचे प्रतीक कसा आहे, हे सविस्तर मांडले आहे.
***
निलिमा चितळे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2198858)
आगंतुक पटल : 8