महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला व बालविकास मंत्रालयातर्फे 100 दिवसांची बालविवाह मुक्त भारत मोहीम उद्यापासून सुरु होणार


या मोहिमेचे 3 टप्पे असून नागरिक, संस्था व सामाजिक नेत्यांनी या बालविवाहमुक्त भारत उभारण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे मंत्रालयाचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 03 DEC 2025 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025

बालविवाहमुक्त भारत मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ साठी तयार केलेली ही 100 दिवसांची विशेष बालविवाहमुक्त भारत जागरूकता मोहीम उद्यापासून म्हणजे 4 डिसेंबर 2025 पासून नवी दिल्लीतील विज्ञान भवनातून सुरु होईल. महिला व बालविकास मंत्रालयाने 27 नोव्हेंबर 2024 रोजी बालविवाहमुक्त भारत मोहीम सुरु केली होती, त्याला 27 नोव्हेंबर 2025 रोजी 1 वर्ष पूर्ण झाले. उद्या होणाऱ्या समारंभासाठी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी व राज्यमंत्री सावित्री ठाकूर  उपस्थित राहणार आहेत. 

या कार्यक्रमात बालविवाह रोखण्यासाठी सर्वांना प्रतिज्ञा दिली जाईल, तसेच बालविवाह प्रतिबंध विषयातील देशभरातील प्रेरणादायी घटना व गावागावातून प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अनुभव आधारित चित्रफीत दाखवली जाईल. तसेच  यातून या मोहिमेचा आढावा आणि पुढील टप्प्याची योजना यांची कल्पना येऊ शकेल. या समारंभाचे थेट प्रक्षेपण https://webcast.gov.in/mwcd या लिंक वर पाहता येईल. 

100 दिवसांची विशेष मोहीम ( 27 नोव्हेंबर 2025 - 8 मार्च 2026)

समाजातील सर्व घटकांना ज्यातून प्रेरणा व नवी ऊर्जा मिळेल आणि ही कुप्रथा बंद करण्यासाठी सातत्यपूर्ण कृती होत राहतील अशा पद्धतीने या मोहिमेची तीन टप्प्यांमध्ये योजनाबद्ध आखणी केली गेली आहे. 

पहिला टप्पा: 27 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025

शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठांमधून वादस्पर्धा, निबंधस्पर्धा , चर्चासत्रे, तसेच बालविवाह रोखण्यासाठी प्रतिज्ञा घेण्याचे समारंभ आयोजित केले जातील.  

दुसरा टप्पा : 1 ते 31 जानेवारी 2026

धार्मिक नेते , समाजातील प्रभावशाली व्यक्ती, विवाहविषयक सेवा देणारे गट इत्यादींबरोबर चर्चा घडवून आणणे  व त्याद्वारे बालकांचे हक्क, त्यांची सुरक्षितता व सक्षमीकरणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्मिती करणे. 

तिसरा टप्पा : 1 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026

ग्रामपंचायत व महानगरपालिकांनीं आपापल्या बैठकीत आपला प्रभाग बालविवाहमुक्त असल्याची घोषणा करणारे ठराव मंजूर करावेत यासाठी त्यांना प्रेरित करणे. 

ही देशव्यापी मोहीम आरोग्य व कुटुंबकल्याण, पंचायती राज, ग्रामीण विकास व शिक्षण  मंत्रालय यांच्या सहकार्याने राबवली जाईल व त्याद्वारे ती तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. या 100 दिवसांच्या मोहिमेच्या माध्यमातून मंत्रालय देशाचे नागरिक, संस्था, व समुदाय नेत्यांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन बालविवाहमुक्त भारताच्या वचनबद्धतेत सरकारचा  सहयोग देतील. 


नेहा कुलकर्णी/उमा रायकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2198393) आगंतुक पटल : 55
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Odia , Tamil , Kannada