राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वर्ष 2025 साठीचे दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार केले प्रदान

प्रविष्टि तिथि: 03 DEC 2025 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (3 डिसेंबर 2025) आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे 2025 साठी दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले. समानता हा दिव्यांग व्यक्तींचा देखील अधिकार आहे. समाज आणि  राष्ट्राच्या विकासाच्या यात्रेत त्यांचा समान सहभाग सुनिश्चित करणे हे  दानधर्माचे कार्य नव्हे तर सर्वांचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले. 

"सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांगांचा सहभाग असलेल्या समाजाला चालना देणे" ही  यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाची संकल्पना देखील या पुरोगामी विचारावर आधारित आहे", असे त्या म्हणाल्या.

आपला देश कल्याणकारी मानसिकतेच्या पलीकडे विचार करुन दिव्यांग व्यक्तींसाठी   अधिकारांवर आधारित आणि त्यांच्या प्रतिष्ठेला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या व्यवस्थेचा पुरस्कार करतो, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

अपंगत्त्व असलेल्या व्यक्तींप्रति विशेष आदर दर्शवण्यासाठी 2015 पासून त्यांना दिव्यांगजन म्हणून संबोधण्याचा निर्णय घेण्यात आला.दिव्यांग व्यक्तींच्या हिताच्या गोष्टींमध्ये सरकार सोबतच समाजाने देखील तितकेच जागरूक आणि सक्रिय राहिले पाहिजे, यामुळे सरकारच्या प्रगतीशील प्रयत्नांना बळकटी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपतींचे भाषण वाचवण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

 

सुवर्णा बेडेकर/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(रिलीज़ आईडी: 2198183) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Malayalam