पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी गोव्यातील काणकोण इथे दिलेल्या भेटीची क्षणचित्रे केली सामायिक

Posted On: 28 NOV 2025 10:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 नोव्हेंबर 2025

 

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाली जीवोत्तम मठाच्या सार्ध पंचाशतामानोत्सव अर्थात 550 व्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त, आज गोव्यातील काणकोण इथे दिलेल्या भेटीची काही क्षणचित्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर सामायिक केली आहेत.

या भेटीत पंतप्रधानांनी श्री संस्थान गोकर्ण पर्तगाली जीवोत्तम मठात प्रभू श्री राम यांच्या कांस्य धातूपासून बनवलेल्या 77 फूट उंच मूर्तीचेही अनावरण केले. तसेच, या मठाने विकसित केलेल्या रामायण थीम पार्क गार्डनचेही (रामायण या संकल्पनेवरील उद्यान) उद्घाटन केले. यावेळी विशेष टपाल तिकीट आणि स्मारक नाणेही प्रकाशित केले.

या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर स्वतंत्रपणे सामायिक केलेले संदेश:

"पर्तगाली आणि उडुपी हे दोन्ही मठ एकाच आध्यात्मिक प्रवाहाच्या जिवंत धारा आहेत. मला विश्वास आहे की, विनम्रता, संस्कार आणि सेवेचे प्रतीक असलेल्या या मठांकडून भावी पिढ्यांनाही सातत्याने ऊर्जा मिळत राहील."

 

"ज्यावेळी गोव्यातील मंदिरांना आणि स्थानिक परंपरांना संकटांचा सामना करावा लागला होता, त्यावेळी पर्तगाली मठासारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन इथल्या सांस्कृतिक ओळखीचे संरक्षण केले."

 

"आज भारत एका अद्भुत सांस्कृतिक पुनर्जागरणाचा साक्षीदार बनत आहे, याची एक नाही, असंख्य उदाहरणे आहेत..."

 

"संस्थान गोकर्ण पर्तगाली जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त काणकोण इथे एक अविस्मरणीय कार्यक्रम झाला. ही काही क्षणचित्रे.."

 

"श्री संस्थान गोकर्ण पर्तगाली जीवोत्तम मठात प्रभू श्री राम यांच्या 77 फूट उंच मूर्तीचे अनावरण केले. देशभरातील भाविकांनी इथे यावे, आणि या मूर्तीचे दर्शन घ्यावे असे आवाहन मी करतो. हा अनुभव नक्कीच खूप खास असेल."

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2196271) अभ्यागत कक्ष : 31