माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रसार भारतीने 'डीडी फ्री डिश'वर लोकप्रिय प्रादेशिक वाहिन्या समाविष्ट करण्यासाठी सुरु केला प्रायोगिक उपक्रम
डीडी फ्री डिशने माहिती आणि शिक्षणाच्या उपलब्धतेला दिली बळकटी; देशभरातील 65 दशलक्ष घरांपर्यंत पसरली व्याप्ती
डीडी फ्री डिश' नवीन प्रायोगिक उपक्रमांतर्गत 31 मार्च 2026 पर्यंत प्रादेशिक भाषेतील वाहिन्यांना विनामूल्य एमपीईजी -4 स्लॉट प्रदान करणार
प्रविष्टि तिथि:
28 NOV 2025 7:26PM by PIB Mumbai
प्रसार भारती 'डीडी फ्री डिश' प्लॅटफॉर्मवर एक प्रायोगिक योजना सुरू करत आहे, ज्या अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने परवानगी दिलेल्या आणि परवानाधारक लोकप्रिय प्रादेशिक भाषेतील चॅनेल्सना (आठव्या अनुसूचीतील हिंदी आणि उर्दू वगळता इतर भाषा), नव्याने अपग्रेड केलेल्या एमपीईजी -4 स्ट्रीम्सवरील रिक्त 'डीडी फ्री डिश' स्लॉटच्या वाटपासाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
प्रतिनिधित्व नसलेल्या आणि अल्प-प्रतिनिधित्व असलेल्या क्षेत्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रसार भारतीचा हा प्रयत्न, इतर कामांव्यतिरिक्त, प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देऊन प्रवेश, संधी आणि जागरूकता यातील तफावत दूर करण्याच्या बांधिलकीवर आधारित आहे.
'डीडी फ्री डिश' प्लॅटफॉर्मवर अल्प-प्रतिनिधित्व असलेल्या किंवा प्रतिनिधित्व नसलेल्या कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली, आसामी आणि ओडिया भाषेच्या प्रादेशिक वाहिन्यांना इतर प्रादेशिक भाषेतील वाहिन्यांपेक्षा प्राधान्य दिले जाईल. तसेच, प्रादेशिक वृत्तवाहिन्यांना देखील बिगर वृत्त प्रादेशिक वाहिन्यांपेक्षा प्राधान्य दिले जाईल.
या प्रादेशिक वाहिन्यांना प्रायोगिक तत्त्वावर विनामूल्य स्लॉट वितरित केले जातील. हे वाटप केवळ 31.03.2026 पर्यंतच्या कालावधीसाठी असेल.
'डीडी फ्री डिश'च्या वाहिन्यांच्या बुकेमध्ये विविधता आणि आशयसमृद्धी आहे, ज्यात बहुतांश प्रकारांचे प्रतिनिधित्व केले जाते. सध्या 'डीडी फ्री डिश'मध्ये 482 टीव्ही वाहिन्या (ज्यात पीएम ई-विद्या आणि स्वयं प्रभासारख्या 320 डीडी सह-ब्रँडेड शैक्षणिक वाहिन्यांचा समावेश आहे) आणि 48 रेडिओ वाहिन्यांचा बुके आहे. दूरदर्शन वाहिन्यांव्यतिरिक्त, या बुकेमध्ये मनोरंजन , वृत्त , भक्ती, चित्रपट, क्रीडा इत्यादींच्या खाजगी टीव्ही वाहिन्या देखील आहेत.
प्रसार भारतीचा 'डीडी फ्री डिश' डायरेक्ट-टू-होम प्लॅटफॉर्म हा एक फ्री टू एअर प्लॅटफॉर्म आहे, जिथे प्रेक्षकांकडून कोणतेही मासिक किंवा वार्षिक सदस्यता शुल्क घेतले जात नाही. या अद्वितीय आणि परवडणाऱ्या मॉडेलमुळे 'डीडी फ्री डिश' सर्वात मोठा डीटीएच प्लॅटफॉर्म बनला आहे. क्रोम डेटानुसार, तो दुर्गम, ग्रामीण, पोहोच नसलेल्या आणि सीमावर्ती भागांसह सुमारे 65 दशलक्ष घरांपर्यंत पोहोचला आहे. 'डीडी फ्री डिश'च्या माध्यमातून प्रसार भारती देशाच्या दुर्गम कानाकोपऱ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण आणि विनामूल्य माहिती, शिक्षण आणि मनोरंजन पुरवून सर्वसामान्य जनतेचे सक्षमीकरण करत आहे, ज्यामुळे समाजातील उपेक्षित आणि दुर्बल घटकांनाही लाभ मिळाल्याने सार्वजनिक सेवा प्रसारणाचे आपले मुख्य उद्दिष्ट पूर्ण करत आहे.
***
निलिमा चितळे/शैलश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2196151)
आगंतुक पटल : 4