वैयक्तिक संघर्षांपासून ते ऑस्करपर्यंत: कोलंबियन चित्रपट 'अ पोएट' ने केली चमकदार कामगिरी
'द डेव्हिल स्मोक' -वास्तव धूसर करणारी भयावह कौटुंबिक कथा
'सेस्ट सी बॉन' मोंटँड-सिग्नोरेटची उत्कटता आणि उलथापालथाची पुन्हा भेट घडविणारी कथा
#IFFIWood, 27 नोव्हेंबर 2025
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तीन खंडांतील तीन चित्रपट चमकले, ज्यात फ्रान्स, कोलंबिया आणि मेक्सिकोमधील चित्रपट निर्माते त्यांचे काम सादर करण्यासाठी आणि त्यांचा सर्जनशील प्रवास उलगडून दाखवण्यासाठी आज पत्रकार परिषदेत एकत्र आले. दोन चित्रपट - अ पोएट आणि सेस्ट सी बॉन - प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी स्पर्धा करत आहेत, तर तिसरा, द डेव्हिल स्मोक्स सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी स्पर्धा करत आहे.
या कार्यक्रमात कोलंबियातील 'अ पोएट' या चित्रपटाचा समावेश होता , ज्याचे सादरीकरण दिग्दर्शक सिमोन जैरो मेसा सोतो आणि निर्मात्या सारा नानक्लेअर्स यांनी केले; मेक्सिकन चित्रपट 'द डेव्हिल स्मॉक्स' चे प्रतिनिधित्व निर्माते अर्नेस्टो मार्टिनेज बुसिओ यांनी केले तर फ्रान्सचे अनुभवी दिग्दर्शक डायन कुरिस यांनी 'सेस्ट सी बॉन' सादर केला.

अर्नेस्टोने एका दमदार चित्रपटाद्वारे केले पदार्पण
परिषदेत बोलताना, अर्नेस्टो मार्टिनेज बुसिओ यांनी नमूद केले की 'द डेव्हिल स्मॉक्स' हा चित्रपट एक चित्रपट निर्माता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट आहे. लघुपटांपासून ते पूर्ण-लांबीच्या चित्रपट निर्मितीपर्यंतचा त्यांचा प्रवास एक महत्त्वपूर्ण सर्जनशील झेप असल्याचे त्यांनी सांगितले. हा चित्रपट पाच शांत भावंडांभोवती फिरतो, या मुलांना त्यांच्या पालकांनी सोडून दिले आहे आणि त्यांची आजी त्यांची देखभाल करते जी स्किझोफ्रेनियाने ग्रस्त आहे. यामुळे मुलांसाठी वास्तव आणि कल्पना यातील सीमारेषा धूसर होतात.एर्नेस्टो यांनी सांगितले की, चित्रपटासाठी कलाकारांची निवड प्रक्रिया अतिशय चोखंदळपणे आणि विचारपूर्वक करण्यात आली. त्यांनी बाल कलाकारांमध्ये विश्वास आणि भावनिकदृष्ट्या प्रामाणिकपणा निर्माण करण्यासाठी बालकलाकारांबरोबर विशेष मास्टरक्लास आयोजित केला. माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना, त्यांनी जागतिक स्तरावर प्रतिध्वनीत होणाऱ्या स्थानिक कथा सांगण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर भर दिला. ते म्हणाले की ते कथेच्या जागतिक प्रभावावर अधिक विचार करण्याऐवजी कथेवरच लक्ष केंद्रित करण्यास प्राधान्य देतात.

"द पोएट" दिग्दर्शकाच्या वैयक्तिक प्रवासाने प्रेरित
कोलंबियन दिग्दर्शक सिमोन जैरो मेसा सोतो यांनी सांगितले की 'द पोएट ' हा त्यांचा केवळ दुसराच चित्रपट आहे, ज्याची पटकथा त्यांनीच लिहिली आहे. त्यांनी खुलासा केला की ही कथा वैयक्तिक अनुभव आणि सुरुवातीच्या जीवनातील संघर्षांवरून प्रेरित आहे. हा चित्रपट एका वृद्ध कवीवर केंद्रित आहे जो एका प्रतिभावान किशोरवयीन मुलीला मार्गदर्शन करताना नव्याने उद्देश शोधतो, भले तो तिला कविता विश्वातील आव्हानांबाबत अवगत करण्यासाठी चिंतीत आहे , एकेकाळी त्याच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा या आव्हानांमुळे पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. विशेषतः त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या माफक यशानंतर कोलंबियामध्ये या चित्रपटाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांनी नमूद केले की अ पोएटची ऑस्करमध्ये कोलंबियाची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. मेसा यांनी कोलंबियन चित्रपटाच्या विकसित होत असलेल्या परिदृश्यावर चर्चा केली, स्थानिक प्रेक्षक हळूहळू देशांतर्गत चित्रपटांकडे आकर्षित होत आहेत असे नमूद केले. त्यांनी महामारीच्या काळातील पदार्पणाच्या आणि सध्याच्या चित्रपट प्रदर्शनादरम्यान आलेल्या विरोधाभासी वितरण अनुभवांवर देखील विचार मांडले.

कुरिस यांनी "सेस्ट सी बॉन" या नवीन चित्रपटातील वास्तविक कथा अधोरेखित केल्या
ज्येष्ठ फ्रेंच चित्रपट निर्माते डायने कुरिस यांनी त्यांच्या "सेस्ट सी बॉन" या चित्रपटाबद्दल बोलताना, वास्तववादी कथांना प्रामाणिकपणे रूपांतरित करण्याची त्यांची आवड अधोरेखित केली. हा चित्रपट सिनेमा आयकॉन यवेस मोंटँड आणि सिमोन सिग्नोरेट यांच्यातील चढ-उतार असलेली प्रेमकथा मांडतो, ज्यांचे खोल नाते मोंटँडच्या मर्लिन मनरोसोबतच्या प्रेमसंबंधामुळे डगमगले आहे. जुन्या पॅरिसची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट प्रेम, विश्वासघात आणि कलात्मक प्रसिद्धीचे एक युग दाखवतो. कुरिसने सांगितले की तिचा पहिला चित्रपट तिच्या स्वतःच्या कुटुंबावर आधारित होता जो आजही तिचा सर्वात यशस्वी चित्रपट आहे. तिने अधोरेखित केले की सिनेमॅटिक कला सतत विकसित होत राहते आणि फ्रेंच समाज आणि फ्रेंच चित्रपट उद्योगाने दिलेल्या मजबूत संस्थात्मक पाठिंब्यामुळे फ्रेंच चित्रपटाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे.

या वर्षीच्या इफ्फीमध्ये प्रदर्शित समकालीन चित्रपटांची विविधता, खोली आणि आंतरराष्ट्रीय भावना या परिषदेत अधोरेखित करण्यात आल्या.

पत्रकार परिषदेची लिंक:
चित्रपटांचे ट्रेलर:
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, Click on:
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2191742
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2190381
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56new/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2195761
| Visitor Counter:
7