जिथे जंगल मूळ धरते : ‘वन्या’ तून उलगडले शब्दांपलीकडचे प्रेम
‘चौक युनिव्हर्सिटी का व्हाईस चान्सलर’ या चित्रपटातून महान साहित्यिक अमृतलाल नागर यांच्या जीवन आणि वारशाचा गौरव
#IFFIWood, 25 नोव्हेंबर 2025
"जिंदगी लैला है, उसे मजनू की तरह प्यार करो..."
ही ओळ त्या कक्षात एका एका धाडसी, काव्यात्मक आणि जगण्यापेक्षा विशाल अशा अभिजात हिंदी चित्रपटाच्या सुरुवातीचा संवाद भासणारी ती ओळ त्या खोलीतल्या प्रत्येकाला भिडली. ही प्रसिद्ध उक्ती 20 व्या शतकातील सर्वात लोकप्रिय हिंदी लेखकांपैकी एक असलेल्या पद्मभूषण अमृतलाल नागर यांची आहे. ते एक असे व्यक्तिमत्त्व होते, जे केवळ आयुष्य जगलेच नाही, तर त्यांनी ते एखाद्या सादरकीकरणाप्रमाणे एका उत्सवात ते रूपांतरीत केले.
आज भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी-2025 मध्ये, ‘वन्या’ (Vanya) आणि ‘चौक युनिव्हर्सिटी का व्हाईस चान्सलर – पद्मभूषण अमृतलाल नागर’ या चित्रपटांच्या चमूंची एकत्रित पत्रकार परिषद झाली. ही पत्रकार परिषद चैतन्यमयी, मनाला भिडणारी, आणि एकाच मंचावर दोन वेगळे विश्व एकत्र साकाकरणारी ठरली.

एकीकडे दिग्दर्शक बडिगेर देवेंद्र आणि अभिनेत्री मेघना बेलवाडी यांनी वन्या या भावनात्मक चित्रपटातून, निसर्गाशी एकरुप झालेल्या एका व्यक्तीचे जंगलाशी असलेले अतूट नाते टिपण्याचा त्यांचा प्रवास मांडला. दुसरीकडे दिग्दर्शिका सविता शर्मा नागर आणि राजेश अमरोही यांनी आपला मार्मिकपणा, माणुसकी आणि सांस्कृतीशी असलेल्या गहिऱ्या नात्याने अनेक पिढ्यांना आकार देणारे साहित्यातले आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या नागर यांचा वारसा पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
साहित्यिक दंतकथा पडद्यावर पुन्हा जिवंत
दिग्दर्शक सविता शर्मा नागर आणि राजेश अमरोही यांनी प्रतिथयश लेखक अमृतलाल नागर यांच्यावरील त्यांच्या वृत्तचित्र शैलीतील चित्रपटाबद्दल उत्कठांपूर्ण संवाद साधला. नागरजी हे एक स्वतः एखाद्या उत्सवी सोहळ्यासारखे होते असे त्यांनी सांगितले.
नागरजी अगदी भुरळ पडावी अशा पद्धतीने जीवन जगले, त्यांच्या जगण्यातल्या त्या चिरकाल आनंदाचा उत्सव या चित्रपटातून साजरा केला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा मार्मिक स्वभाव, त्यांचा साधेपणा, त्यांच्या स्वभावातील गहिरेपणा, हे सर्व पडद्यावर दाखवले जावे असेच होते, असे त्यांनी सांगितले.

आपल्या चित्रपटाच्या चमूने नागरजींच्या जीवनातील घडामोडींविषयी अभ्यास करण्यासाठी आणि ते पुन्हा एकदा तसेच्या तसे मांडण्यासाठी पाच वर्षे खर्ची केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची फार कमी छायाचित्रे उपलब्ध होती, त्यामुळे त्यांच्या आठवणी, मुलाखती आणि साहित्यिक विषयक नोंदींवर अवलंबून राहावे लागले, आणि त्याआधारे आपण कथेचे तब्बल सात मसुदे तयार केल्याचे त्या म्हणाल्या. आपण आपल्या लेखकांचा पुरेसा योग्य गौरव करत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपला हा चित्रपट त्या महान व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली आदरांजली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सह-दिग्दर्शक राजेश अमरोही यांनी देखील आपले अनुभव मांडले. अमृतलाल नागर यांनी केवळ मनोरंजनासाठी लेखन केले नाही. तर त्यांनी आपल्या देशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाचे दस्तऐवजीकरण केले असल्याचे अमरोही यांनी सांगितले. नागरजी हे आधुनिक भारतीय साहित्यातील सर्वाधिक बहुआयामी व्यक्तींपैकी एक आहेत असे त्यांनी नमूद केले.
आपल्या या चित्रपटातून नागर यांच्या आयुष्यातील घटना पुन्हा एकदा साकारल्या आहेत, तसेच समीक्षक, लेखक आणि नागर यांच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या विस्तृत तपशीलवार मुलाखतींचा आधार घेतला आहे. त्यांच्या साहित्यातून आजही समाजाचे विस्मयचकीत करणारे प्रतिरुप दिसते, अशा साहित्यिकाचे जगणे प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले.
वन्या (VANYA) : निसर्ग आणि जगातील संघर्ष आणि त्यातील प्रेम
दिग्दर्शक बडिगेर देवेंद्र यांनी त्यांच्या कन्नड भाषेतील ‘वन्या’ (Vanya) या चित्रपटाबद्दल सांगितले. ही कथा एका वृद्ध व्यक्तीची आहे, प्रशासन या व्यक्तीला जबरदस्तीने स्थलांतर करू पाहते आहे, मात्र ही व्यक्ती आपली जंगलातील झोपडी सोडण्यास नकार देते. हा चित्रपट म्हणजे शहरातील गोंगाट आणि वन्यजीवनातील शांत, भावपूर्ण वास्तवामधला विरोधाभास असल्याचे देवेंद्र यांनी सांगितले.
अभिनेत्री मेघना बेलवाडी यांनी, या चित्रपटात त्या वृद्धाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. त्यांनी आपल्या पात्राच्या भावनात्मक गुंतागुंतीविषयी सांगितले. ती व्यक्त होणारी नाही. ती चिडलेली, द्विधा मनस्थितीत वावरणारी आहे आणि वडिलांचे मत वळवण्याच्या एका भावनात्मक सापळ्यात ओढली गेलेली आहे. त्या वृद्ध व्यक्तीने कधीच तिला 'माझे तुझ्यावर प्रेम आहे' असे बोलून दाखवलेले नाही, मात्र ते प्रेम त्याने कृतीतून दाखवलेले आहे. या सगळ्याने आपल्या मनला खूप गहिरेपणाने स्पर्ष केला असल्याचे मेघना यांनी सांगितले.

जंगलात चित्रीकरण करताना आलेल्या आव्हानात्मक, आणि उत्कंठापूर्ण अनुभव या चित्रपटाच्या चमूने मांडले. केवळ सूर्यप्रकाश असेपर्यंतच चित्रिकरण करता येत होते, आणि अशातच आसपास वन्यजीवांचाही वावर होता, पण स्थानिकांनी आम्हाला जिव्हाळ्याने सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाच्या पूर्व निर्मितीच्या निमित्ताने झालेल्या भेटींमधून परस्परांमध्ये निर्माण झालेला विश्वासच, चित्रपटाचा आधार बनला असे मेघना यांनी सांगितले.
आपण स्वतःला मोठी अभिनेत्री मानत नाही. आपण त्यांच्यातली स्पष्टता, त्यांनी मांडलेला भावनात्मक आलेख, आणि त्यांनी निर्माण केलेल्या जग या सगळ्या बाबतीत, दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवून काम केले,प्रवेश केला, अशी भावनाही अभिनेत्री मेघना यांनी व्यक्त केली.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, Click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सोनाली काकडे/तुषार पवार/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2194616
| Visitor Counter:
5