पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी आपल्या कुरुक्षेत्र भेटीची क्षणचित्रे केली सामायिक

प्रविष्टि तिथि: 25 NOV 2025 11:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 नोव्हेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 25 NOV 2025 रोजी हरियाणातील आपल्या कुरुक्षेत्र भेटीची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत. त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र शंखाच्या सन्मानार्थ नव्याने बांधलेल्या 'पांचजन्य'चे उद्घाटन केले. त्यानंतर, त्यांनी महाभारतातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे चित्रण करणाऱ्या तसेच त्याचे शाश्वत सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या महाभारत अनुभव केंद्राला भेट दिली.हे प्रदर्शन बघताना भान हरपून जाते,असे त्यांनी म्हटले आहे.त्यानंतर पंतप्रधानांनी नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या हौतात्म्य दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमातही भाग घेतला आणि उपस्थितांना संबोधित केले.त्यानंतर त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या दिव्य कथनाशी संबंधित असलेल्या आणि भारतातील सर्वात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक असलेल्या ब्रह्म सरोवराचे दर्शन घेतले आणि पूजा केली.

आपल्या एक्स पोस्टवरील विविध पोस्ट्सच्या मालिकांतून मोदी म्हणाले:

"श्री गुरु तेग बहादूरजींना,त्यांच्या 350 व्या शहीद दिनानिमित्त, आम्ही वंदन करतो. त्यांचे अतुलनीय साहस आणि सर्वोच्च बलिदान लाखो लोकांना सदैव प्रेरणा देत राहील."


“ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ 350ਵੇਂ ਸ਼ਹੀਦੀ ਦਿਵਸ 'ਤੇ, ਅਸੀਂ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਜੀ ਨੂੰ ਨਮਨ ਕਰਦੇ ਹਾਂ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਬੇਮਿਸਾਲ ਹਿੰਮਤ ਅਤੇ ਸਰਵਉੱਚ ਬਲੀਦਾਨ ਲੱਖਾਂ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਪ੍ਰੇਰਿਤ ਕਰਦੇ ਹਨ।”

 

“भगवान श्रीकृष्णांचा दिव्य शंख, पांचजन्य याच्या सन्मानार्थ कुरुक्षेत्रात बांधलेले पांचजन्य स्मारक, हे न्याय आणि सत्यप्रियता यांच्या विजयाचे प्रतीक आहे. ते भावी पिढ्यांना सुयोग्य मार्गावरुन चालण्यासाठी नेहमी प्रेरणा देत राहील."

 


“कुरुक्षेत्रातील "महाभारत अनुभव केंद्र" ही आपल्या सांस्कृतिक वारशाची एक अद्भुत आणि शक्तिशाली अभिव्यक्ती आहे. याला भेट देणाऱ्या प्रत्येकाला या प्रदर्शनांतून महाभारतातील घटनांचा सखोल तपशीलवार अनुभव मिळेल.”

 


“शीखांचे नववे गुरु श्री तेग बहादूर जी यांच्या 350 व्या हौतात्म्य दिनानिमित्त त्यांच्या सन्मानार्थ एक विशेष नाणे आणि स्मरणार्थ एक टपाल तिकिट जारी करताना मला खूप अभिमान वाटतो.”

 


“कुरुक्षेत्र येथील प्रदर्शनातून मला श्री गुरु तेग बहादूरजींचे अतुलनीय धैर्य, त्याग आणि आपला सांस्कृतिक वारसा पाहण्याची संधी मिळाली.”

 


“कुरुक्षेत्रश्री गुरु तेग बहादूर जी यांच्या,350 व्या हुतात्मा दिनानिमित्त कुरुक्षेत्रात मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना माझे मनापासून कोटी कोटी प्रणाम!”

 


“श्री गुरु तेग बहादूर साहिब सारख्या महापुरुषांचे त्याग आणि समर्पण आजच्या मजबूत भारताच्या प्रतिमेतून दृगोच्चर होते.”

 


“गेल्या ११ वर्षात, आमच्या सरकारने आपले गुरु आणि शीख समुदायाशी संबंधित पवित्र परंपरांना राष्ट्रीय सण म्हणून स्थान दिले आहे याबद्दल मला समाधान वाटत आहे.”

 


“पवित्र "जोडा साहिब शी संबंधित सर्व सत्य माहिती लक्षात घेऊन, आम्ही एकत्रितपणे ते तख्त श्री पटना साहिबला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येणाऱ्या पिढ्यांसाठी या पवित्र वारशाचे जतन होईल."

 

“गुरू साहिबांकडून प्रेरणा घेऊन, आजचा भारत अदम्य धैर्याने आणि पूर्ण ताकदीने पुढे जात आहे. ऑपरेशन सिंदूर हे याचे एक उत्तम उदाहरण आहे.”

 


“श्री गुरुसाहेबांशी संबंधित या महत्त्वाच्या प्रसंगी माझ्या समुदायाला आणि तरुण मित्रांना मी एक विशेष आवाहन करतआहे.…”

 


“ਸਿੱਖਾਂ ਦੇ ਨੌਵੇਂ ਗੁਰੂ ਸ੍ਰੀ ਤੇਗ਼ ਬਹਾਦਰ ਜੀ ਦੇ 350ਵੇਂ ਸ਼ਹੀਦੀ ਦਿਹਾੜੇ 'ਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਨਮਾਨ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਸਿੱਕਾ ਅਤੇ ਯਾਦਗਾਰੀ ਡਾਕ ਟਿਕਟ ਜਾਰੀ ਕਰਕੇ ਬਹੁਤ ਮਾਣ ਮਹਿਸੂਸ ਕਰ ਰਿਹਾ ਹਾਂ।”

 

“ਕੁਰੂਕਸ਼ੇਤਰ ਦੀ ਪ੍ਰਦਰਸ਼ਨੀ ਵਿੱਚ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਤੇਗ਼ ਬਹਾਦਰ ਜੀ ਦੀ ਅਦੁੱਤੀ ਦਲੇਰੀ, ਤਿਆਗ ਅਤੇ ਸਭਿਆਚਾਰਕ ਵਿਰਾਸਤ ਦਾ ਗਵਾਹ ਬਣਨ ਦਾ ਸੁਭਾਗ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ।”

 


“ਕੁਰੂਕਸ਼ੇਤਰ ਵਿੱਚ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਤੇਗ਼ ਬਹਾਦਰ ਜੀ ਦੇ 350ਵੇਂ ਸ਼ਹੀਦੀ ਦਿਹਾੜੇ ਨਾਲ ਸਬੰਧਤ ਸਮਾਗਮ ਵਿੱਚ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਆਈ ਸੰਗਤ ਨੂੰ ਮੇਰਾ ਕੋਟਿ-ਕੋਟਿ ਸਿਜਦਾ!”

 


“ਅੱਜ ਹਿੰਦੋਸਤਾਨ ਦਾ ਜੋ ਮਜ਼ਬੂਤ ਸਰੂਪ ਹੈ, ਉਸ ਵਿੱਚ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਤੇਗ਼ ਬਹਾਦਰ ਸਾਹਿਬ ਜਿਹੇ ਯੁਗਪੁਰਸ਼ਾਂ ਦਾ ਤਿਆਗ ਅਤੇ ਸਮਰਪਣ ਵੀ ਸਮਾਇਆ ਹੋਇਆ ਹੈ।”

 

“ਮੈਨੂੰ ਸੰਤੁਸ਼ਟੀ ਹੈ ਕਿ ਪਿਛਲੇ 11 ਸਾਲਾਂ ਵਿੱਚ ਸਾਡੀ ਸਰਕਾਰ ਨੇ ਸਾਡੇ ਗੁਰੂਆਂ ਅਤੇ ਸਿੱਖ ਭਾਈਚਾਰੇ ਨਾਲ ਸਬੰਧਤ ਪਵਿੱਤਰ ਪਰੰਪਰਾਵਾਂ ਨੂੰ ਰਾਸ਼ਟਰੀ ਉਤਸਵ ਵਜੋਂ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤਾ ਹੈ।”

 


“ਪਵਿੱਤਰ 'ਜੋੜਾ ਸਾਹਿਬ' ਨਾਲ ਸਬੰਧਤ ਸਾਰੇ ਤੱਥਾਂ ਨੂੰ ਦੇਖਦੇ ਹੋਏ ਅਸੀਂ ਇਹ ਸਮੂਹਿਕ ਫ਼ੈਸਲਾ ਲਿਆ ਕਿ ਇਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਤਖ਼ਤ ਸ੍ਰੀ ਪਟਨਾ ਸਾਹਿਬ ਨੂੰ ਸਮਰਪਿਤ ਕੀਤਾ ਜਾਵੇਗਾ। ਇਸ ਨਾਲ ਇਹ ਪਵਿੱਤਰ ਵਿਰਾਸਤ ਆਉਣ ਵਾਲੀਆਂ ਪੀੜ੍ਹੀਆਂ ਲਈ ਵੀ ਸੁਰੱਖਿਅਤ ਰਹੇਗੀ।”

 

“ਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਤੋਂ ਪ੍ਰੇਰਨਾ ਲੈ ਕੇ ਅੱਜ ਦਾ ਭਾਰਤ ਅਦੁੱਤੀ ਦਲੇਰੀ ਅਤੇ ਪੂਰੀ ਤਾਕਤ ਨਾਲ ਅੱਗੇ ਵਧ ਰਿਹਾ ਹੈ। ਆਪ੍ਰੇਸ਼ਨ ਸਿੰਧੂਰ ਇਸ ਦੀ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡੀ ਉਦਾਹਰਣ ਹੈ।”

 

“ਆਪਣੇ ਸਮਾਜ ਅਤੇ ਨੌਜਵਾਨ ਸਾਥੀਆਂ ਨੂੰ ਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਨਾਲ ਸਬੰਧਤ ਇਸ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਮੌਕੇ 'ਤੇ ਮੇਰੀ ਇੱਕ ਖ਼ਾਸ ਬੇਨਤੀ...”
 

 

“कुरुक्षेत्रातील आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवादरम्यान, मला पवित्र ब्रह्म सरोवराला भेट देण्याचे आणि पूजा करण्याचे भाग्य लाभले. मी येथील महाआरतीत सहभागी झालो आणि माझ्या सर्व देशवासियांच्या सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली.”

 

* * *

सोनाली काकडे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे


(रिलीज़ आईडी: 2194544) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam