पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 26 नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित समारंभात सहभागी होणार
भारतीय राज्यघटनेच्या मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोडो, काश्मिरी, तेलुगू, ओडिया आणि आसामी या नऊ भाषांमध्ये अनुवादित आवृत्त्यांचे प्रकाशन करण्यात येणार
प्रविष्टि तिथि:
25 NOV 2025 6:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेल्या समारंभात सहभागी होणार आहेत. राज्य घटना स्वीकारली त्याला यंदा 76 वर्षे पूर्ण होत आहेत.
भारताच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.
या कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येईल. त्यानंतर, भारतीय राज्यघटनेच्या मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोडो, काश्मिरी, तेलगू, ओडिया आणि आसामी या नऊ भाषांमधील अनुवादित आवृत्त्यांचे प्रकाशन करण्यात येईल. याच कार्यक्रमात “भारत के संविधान में कला और कैलीग्राफी” या विषयावरील स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात येणार आहे..
आशिष सांगळे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2194247)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Assamese
,
English
,
Khasi
,
Urdu
,
हिन्दी
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam