इफ्फीद्वारे माहितीपूर्ण मास्टरक्लासेसचे आयोजन आणि आंतरराष्ट्रीय भव्य प्रीमियरचे प्रदर्शन
#IFFIWood, 22 नोव्हेंबर 2025
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मध्ये आज प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कलाकार आणि जागतिक महोत्सवातील दिग्गजांनी सर्जनशीलता, कामगिरी आणि चित्रपटांच्या विकसित होत जाणाऱ्या भविष्यावर सखोल चर्चा केली. या सत्रांमध्ये चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा, लेखक अभिजात जोशी, बर्लिनेलच्या महोत्सव संचालक ट्रिसिया टटल यांच्याशी इफ्फीचे महोत्सव संचालक शेखर कपूर आणि आदिशक्तीचे नाट्यगुरू विनयकुमार यांनी संवाद साधला. या संवादांमुळे सहभागींना चित्रपट निर्मिती कला, भावनिक कामगिरी आणि कथाकथन तसेच महोत्सवांवरील एआय सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा प्रभाव याबद्दल समृद्ध समज प्राप्त झाली.





इफ्फीने आंतरराष्ट्रीय गाला प्रीमियर्सची एक प्रतिष्ठित यादी देखील सादर केली, ज्यामुळे जागतिक स्तरावरील प्रशंसित चित्रपट महोत्सवाच्या प्रेक्षकांसमोर आले. या मालिकेत इटालियन-स्विस चित्रपट मॉस्किटोज, पुनर्संचयित इंग्रजी क्लासिक म्युरिअल्स वेडिंग आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील फ्रेंच शीर्षक असलेला रेनोइर यांचा समावेश होता, ज्यामुळे प्रेक्षकांना समकालीन कथा आणि प्रसिद्ध सिनेमॅटिक कलात्मकतेचे आकर्षक मिश्रण अनुभवता आले.










इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2193055
| Visitor Counter:
5