इफ्फीएस्टाच्या उद्घाटन कार्यक्रमावर इफ्फीच्या स्फूर्तीदायक सांगीतिक आणि सांस्कृतिक प्रवासाची छाप
दूरदर्शनने आमची चित्रपटांच्या जगाशी ओळख करून दिली हे आमचे भाग्यच आहे: अभिनेते अनुपम खेर
वेव्हज ओटीटी कुटुंबासाठी सुरक्षित, हितकारक मनोरंजन देऊ करते: दूरदर्शनचे महासंचालक
#IFFIWood, 22 नोव्हेंबर 2025
गेल्या अनेक वर्षांमध्ये, इफ्फी एका छोट्या चित्रपट महोत्सवापासून चित्रपट, संगीत आणि मानवी जीवन यांच्या जादूला एकत्र आणत गुंगवून टाकणाऱ्या वाटचालीमधून एका भव्य सोहोळ्याच्या रुपात फुलून आला आहे. गेल्या वर्षी इफ्फीएस्टाने संगीत आणि कलेला इफ्फीच्या प्रावरणात गुंफत, या सांस्कृतिक प्रवासाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली.
गोव्याच्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर क्रीडागारात काल संध्याकाळी दूरदर्शन आणि वेव्हज ओटीटी यांनी आयोजित केलेल्या इफ्फीएस्टाच्या भव्य उद्घाटन सोहोळ्यामधून 56व्या इफ्फीने मनांना उजळून टाकण्याची आणि संगीत, संस्कृती तसेच प्रत्यक्ष सादरीकरणाच्या समृद्ध वस्त्राचा शोध घेण्याची स्वतःची परंपरा कायम राखली.

आपापल्या कलेत माहीर असलेल्या सुप्रसिध्द कलाकारांनी व्यासपीठावर एकत्र यायला सुरुवात केल्यावर कालची संध्याकाळ त्या ताऱ्यांच्या चमक लेऊन उजळली. सन्माननीय अभिनेते अनुपम खेर, ऑस्कर पारितोषिक विजेते उस्ताद एम एम किरवाणी आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेती आसामी अभिनेत्री अॅमी बरुआ यांच्यासह भारतीय चित्रपट महासंघाचे अध्यक्ष रवी कोट्टरकारा, खासदार जेवान किम यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली. चित्रपटांच्या जादुई करिष्म्याचा सोहळा साजरा करण्यासाठी या सर्वांसह दूरदर्शनचे महासंचालक के.सतीश नंबुद्रीपाद देखील उपस्थित होते.
भाषणाची सुरुवात करताना महासंचालक नंबुद्रीपाद म्हणाले, “आपणा सर्वांना हे माहित आहे की उपग्रह क्रांतीचे उत्पादन असलेल्या पारंपरिक वाहिन्या आता हळूहळू, कोणत्याही वेळी कार्यक्रम पाहता येतील अशा हाती धरण्याच्या साधनांच्या रुपात, डिजिटल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काळाच्या मागणीनुसार, दूरदर्शनने उत्क्रांत होत जाणेच योग्य ठरेल. वेव्हज ओटीटीसह एका नव्या डिजिटल टप्प्यात प्रवेश करून नेमके हेच साध्य केले जात आहे. वेव्हज ओटीटी कुटुंबासाठी सुरक्षित, हितकारक मनोरंजन देऊ करते,” “डिजिटल साधनांशी चिकटून बसलेल्या संपूर्ण युवा वर्गाने, जनरेशन झी ने आमचे कार्यक्रम पाहण्यासाठी आणि दूरदर्शनने प्रतिनिधित्व केलेल्या आणि अजूनही करत असलेल्या वारशाचे सामर्थ्य अनुभवण्यासाठी दूरदर्शन कडे वळावे, असे आवाहन आम्ही करत आहोत.”
त्यांच्या या मुद्द्याचा धागा पकडून, इफ्फीएस्टाच्या व्यासपीठावरुन अनुपम खेर यांनी आठवण सांगितली, “आम्ही सर्वांनी आमचे कलाजीवन दूरदर्शनसोबत सुरु केले. दूरदर्शनने आमची चित्रपटांच्या जगाशी ओळख करून दिली हे आमचे भाग्यच आहे. दूरदर्शनमुळेच माझा अभिनेता म्हणून जन्म झाला हे मी विसरू शकत नाही.दूरदर्शन हा एक सुगंध आहे जो आपल्या जीवनात दरवळत राहिला आहे, आणि अजूनही आपल्याला वेधून राहिला आहे.”
जेवॉन किम यांच्या वंदे मातरम् च्या भावपूर्ण गायनाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यांचा आवाज या दोन राष्ट्रांना जोडणारा सेतू ठरला. इथे येऊन आपल्याला आनंद वाटत असल्याची भावना त्यांनी गाणे सुरु करण्यापूर्वी व्यक्त केली, आणि उत्साहवर्धक स्वागत केल्याबद्दल आयोजकांचे आभारही मानले. भारत आणि कोरियामधील चित्रपट तसेच आशय समाग्रीच्या क्षेत्रातील परस्पर सहकार्यपूर्ण भागिदारीबद्दल आपण उत्सुक असल्याचे त्या म्हणाल्या.
त्यानंतर, संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात गायक आणि गीतकार ओशो जैन यांचे दोन तासांचे सादरीकरण झाले.

पुढील कार्यक्रम : उत्साहपूर्ण सोहळ्याच्या आणखी तीन रात्री
IFFIESTA 2025 हा उपक्रम 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान चालणार आहेत. आता या उपक्रमाअंतर्गतच्या आणखी तीन संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी विनामूल्य प्रवेशाची सुविधा दिली गेली आहे. या कार्यक्रमांचे नियोजन खालीलप्रमाणेआहे.:
दिवस दुसरा (नोव्हेंबर 22) - नीतू चंद्रा आणि निहारिका रायजादा या दिवसाच्या सूत्रधार म्हणून जबाबदारी सांभाळतील.
- द बँडिट्स (भारत) आणि बीट्स ऑफ लव्ह (आंतरराष्ट्रीय) या दोन वाद्यवृदांमध्ये बॅटल ऑफ बँड्स (Battle of Bands) होईल. इशा मालवीय या सूत्रसंचालक म्हणून जबाबदारी सांभाळतील.
- प्रतिभा सिंग बघेल यांचे सादरीकरण असलेल्या सुरों का एकलव्य या विभागात, जॅक अस्लम, सुप्रिया पाठक, राहुल सोनी, प्रतिक्षा डेका आणि पिकोसा मोहरकर हे कलाकार विशेष पाहुणे कलाकार म्हणून सहभागी होणार आहेत.
- वाह उस्ताद या विभागात वुसात इक्बाल खान हे Folk & Fusion - Mitti Ki Awaaz हा कार्यक्रम सादर करतील.
दिवस तिसरा (नोव्हेंबर 23) – या दिवसातील कार्यक्रमांच्या सूत्रधाराची भूमिका निहारिका पार पाडणार आहेत.
- MH43 (भारत) आणि द स्वस्तिक (आंतरराष्ट्रीय) यांच्यात बॅटल ऑफ बँड्स होणार आहे. हर्ष लिंबाचिया हे या कार्यक्राचे सूत्रसंचलन करतील.
- प्रतिभा सिंग यांच्या प्रमुख सहभागासह, प्रतिक्षा डेका, सागर तिवारी आणि सुप्रिया पाठक या कलाकारांचा सहभाग असलेला सुरों का एकलव्य हा कार्यक्रम होईल.
- वाह उस्तादमध्ये सूफी और भक्ती - इश्क और भक्ती की एक सूर या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे
दिवस 4 (नोव्हेंबर 24) – निहारिका रायजादा या चौथ्या दिवसाच्या सूत्रधार असणार आहेत.
- चौथ्या दिवसाचे बॅटल ऑफ बँड्स द वैरागीज (भारत विजेते) आणि नाईट्स यांच्यात होणार आहे. हुसैन कुवाजरवाला हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
- प्रतिभा सिंग यांच्या प्रमुख सहभागासह, बघेल, जॅक अस्लम, पिकोसा मोहरकर आणि राहुल सोनी या कलाकारांचा सहभाग असलेला सुरों का एकलव्य कार्यक्रम होईल.
- एका विशेष कार्यक्रात रजा मुराद, अथर हबीब, कीर्ती नागपुरे, दिनेश वैद्य, मिलन सिंग आणि अदिती शास्त्री हे कलाकार देवांचल की प्रेम कथा, हे हिमाचल प्रदेशातील लोकनृत्य सादर करणार आहेत.
- या उपक्रमाअंतर्र्गत वाह उस्ताद अंतर्गतचे अंतिम सादरीकरण होईल. अखेरच्या दिवशी Raga & Cinema Fusion - Sur Se Cinema Tak हा कार्यक्रम होईल.
सुरों का एकलव्य विभागाची कल्पना आणि मांडणी गजेंद्र सिंह यांनी केली आहे, तर वाह उस्ताद विभाग दिल्ली घराण्याच्या वतीने सादर केला जात आहे. तर सारेगामाने विशेष पाहुण्या गायकांच्या सादरीकरणाची जबाबदारी सांभाळली आहे.
या चारही संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमांचे DD Bharati या वाहिनीवर थेट प्रसारण केले जाणार आहे. त्यासोबतच WAVES OTT वरही हे कार्यक्रम दाखवले जात आहेत. त्यासोबतच DD National वाहिनीवर विशेष क्षणचित्रे दाखवली जात आहेत.
कार्यक्रमाचे तपशील
- तारीख: 21 ते 24 नोव्हेंबर 2025
- ठिकाण: डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, गोवा
- वेळ: दररोज संध्याकाळी 6:00 वाजल्यापासून (प्रवेश संध्याकाळी 5:00 वाजल्यापासून)
- प्रवेश: 22 ते 24 नोव्हेंबरच्या सादरीकरणासाठी विनामूल्य
- थेट प्रसारण: DD Bharati, WAVES OTT, DD National (क्षणचित्रे)
IFFIESTA बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी: https://www.iffigoa.org/iffi-esta
डीजी, डीडी (DG, DD) यांचे श्रोत्यांना संबोधित करतानाचे भाषण येथे पहा:
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56new/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Post Link: https://x.com/PIB_Panaji/status/1991438887512850647?s=20
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/संजना चिटणीस/तुषार पवार/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2192918
| Visitor Counter:
4