पंतप्रधान कार्यालय
जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
21 NOV 2025 10:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांची आज दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. 2020 मध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत संबंध वाढल्यानंतर गेल्या पाच वर्षांत भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सहकार्य वाढत असल्याबद्दल तसेच सहकार्यात येणाऱ्या विविधतेबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. भारतातील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी भारतासोबत एकजुटता व्यक्त केली. दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईला बळकटी देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी वचनबद्धता व्यक्त केली.
दोन्ही नेत्यांनी राजकीय आणि धोरणात्मक, संरक्षण आणि सुरक्षा, ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक, महत्त्वपूर्ण खनिजे, तंत्रज्ञान, वाहतूक, शिक्षण आणि दोन्ही देशांमधील लोकांचा परस्पर संबंध यासह विस्तृत क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा केली. दोन्ही पंतप्रधानांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचार विनिमय केला.
उच्चस्तरीय संपर्कांच्या वाढलेल्या वारंवारतेमुळे द्विपक्षीय संबंधांना मोठी गती मिळाली आहे याचा दोन्ही नेत्यांनी उल्लेख केला. भारत-ऑस्ट्रेलिया व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी उच्च पातळीवर नेण्याप्रति आपल्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2192863)
आगंतुक पटल : 45
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam