स्वप्नांचा, शोधांचा आणि वारशाचा प्रवास: मुझफ्फर अली आणि शाद अली यांचे चित्रपटसृष्टीच्या दोन युगांवरील चिंतन
‘गमन’पासून ‘झूनी’पर्यंत - विजय, वेदना आणि चित्रपट निर्मात्याच्या आत्म्याला आकार देणाऱ्या नाजूक स्वप्नांचा प्रवास
या ‘इन कॉन्व्हर्सेशन’ सत्राने वडील–मुलाला एका दुर्मिळ, आत्मपरीक्षणात्मक संवादात एकत्र आणले—ज्यात स्मृती, संस्कृती आणि त्यांच्या घडणीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या कलेविषयी झाली चर्चा
#IFFIWood, 21 नोव्हेंबर 2025
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘इफ्फी’ मध्ये 'चित्रपट आणि संस्कृती: दोन पिढ्यांचे प्रतिबिंबे' या विषयावरील इन कॉन्व्हर्सेशन सत्राने भारतीय चित्रपटांच्या अनेक पिढ्यांना जोडणारे एक गवाक्ष खुले केले, जिथे पिता-पुत्र संवादात आठवणी, स्वप्ने आणि कलात्मकता गुंफली गेली. सुरुवातीला, प्रसिद्ध चित्रपट निर्माते रवी कोट्टारकारा यांनी या दोघांचा सत्कार केला आणि त्यांच्या कार्याने भारतीय चित्रपटावर पाडलेल्या कायमस्वरूपी प्रभावाची मनापासून प्रशंसा केली. त्यानंतर दिग्दर्शक शाद अली यांनी सौहार्द आणि अंतर्दृष्टीपूर्ण शैलीत समाजाची सूत्रे हातात घेतली आणि आपले वडील प्रख्यात दिग्दर्शक मुझफ्फर अली यांना त्यांच्या अनेक दशकांचा अनुभव, आठवणी आणि शिकवणीच्या स्मृती प्रवासावर गेले.

शाद अली यांनी अत्यंत सोपा परंतु अर्थपूर्ण प्रश्नाने सुरुवात केली: लहानपणी तुम्ही स्वप्नात पाहिलेला पहिला व्यवसाय कोणता होता? यावर उत्तर देताना मुझफ्फर अली यांनी बालपणीची रेखाचित्रे, कला-वर्गातील बक्षिसे आणि नेहमी सोबत करणारी कवितेची ओढ यांची चादर उलगडली. त्यांनी सांगितले की, नंतर त्यांच्या आयुष्यात चित्रपट आले - एक अशी दुनिया जिथे कथा मांडणीच्या पारंपरिक शृंखलेला तोडून तीव्र भावनांना मोकळी वाट करून देता येईल आणि कल्पनाशक्ती मुक्तपणे फिरू शकेल अशी जागा मिळाली. कलकत्ता या शहराने त्यांना अशा कला जगतात प्रवेश मिळवून दिला जिथे चित्रपट आणि सर्जनशीलता एकत्र येतात आणि अनपेक्षित गोष्टी शक्यतेत परिवर्तित होतात, याची आठवण त्यांनी सांगितली. चित्रपट निर्मितीच्या मूलभूत आधाराबद्दल बोलताना त्यांनी "चित्रपट निर्मिती हेच तुमचे रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, भूगर्भशास्त्र म्हणजे तुमचे मूलभूत अस्तित्व असते", असे मत व्यक्त केले.
मुझफ्फर अली यांनी आपल्या बालपणाच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या लोकांची दुर्दशा आणि असहायता पाहिली होती. हीच अनुभूती फाळणीची वेदना मांडणाऱ्या त्यांच्या ‘गमन’ या चित्रपटाचा भावनिक केंद्रबिंदू ठरली. मुझफ्फर अली म्हणाले की, जरी चित्रपटाने इफ्फीमध्ये रजत मयूर पुरस्कार जिंकला असला तरी, या कामगिरीमुळे त्यांनी कधीही स्वतःला ‘विशेष’ मानले नाही. यशामुळे त्यांना 'प्रबळ' वाटले नाही, तर हे यश त्यांना नवीन संघर्ष आणि नवीन आव्हाने नेहमीच वाट पाहत असतात, ज्याची आठवण करून देत राहिले.

या दोघांमधला संवाद पुढे कला आणि संगीताकडे वळला. शाद अली यांनी आपल्या वडिलांच्या सुरुवातीच्या कलाकृतींच्या विशिष्ट मांडणीबद्दल सांगितले तर मुझफ्फर अली यांनी गमन ते उमराव जान पर्यंतच्या त्यांच्या चित्रपटात जमिनीशी जोडले राहणे हीच आपल्या शैलीची खूण असल्याचे सांगितले. संगीताविषय बोलताना त्यांनी सांगितले की तत्वज्ञान आणि समर्पणातून काव्य जन्म घेत असते. उमराव जानमधील गाणी ही नम्रता आणि सहजीवन प्रदर्शित करणाऱ्या काव्यात्मक संवेदनशीलतेतून जन्माला आली हे त्यांनी स्पष्ट केले. "कविता तुम्हाला स्वप्ने दाखवते आणि कवीनेही आपल्याबरोबर स्वप्न पाहिले पाहिजे,"असे ते म्हणाले.
यानंतर आला झुनी - एक स्वप्न जे आव्हान बनले. काश्मीरमध्ये द्विभाषिक चित्रपटाचे नियोजन करताना लॉजिस्टिक, सांस्कृतिक आणि ऋतुमानानुसार तांत्रिक अडथळ्यांची मालिका समोर उभी राहिली, ज्यामुळे शेवटी चित्रपटाची निर्मिती थांबवावी लागली. मुझफ्फर अली यांनी या अनुभवाचे वर्णन "अनेक स्वप्नांच्या पलीकडे एक स्वप्न" आणि त्याच्या स्वप्नभंगाच्या वेदना असे केले. या चित्रपटाच्या अपूर्ण अवस्थेतही, त्याचा आत्मा आजही जिवंत आहे असे ते म्हणाले. त्यांनी प्रेक्षकांना आठवण करून दिली की, काश्मीर हे केवळ एका चित्रीकरणाचे स्थान नाही तर ती एक जिवंत संस्कृती आहे. "काश्मीरबद्दलचे चित्रपट काश्मीरमध्येच जन्माला आले पाहिजेत," असे त्यांनी सांगितले आणि तरुण स्थानिक प्रतिभेला आपल्या भूमीची कथा स्वतः लोकांना सांगण्याचे आवाहन केले.

शाद अली यांनी 'झूनी' चित्रपटाच्या पुनर्संचयनाविषयी सुरू असलेल्या कामाबद्दल सांगितले - चित्रपटाची रिळे आणि साउंडट्रॅकची पुन्हा पाहणी करणे आणि त्यांच्या वडिलांच्या सिनेमॅटिक दृष्टिकोनाशी पुन्हा जोडले जाणे सुरू आहे असे त्यांनी सांगितले. या प्रवासात त्यांनी चित्रपट केवळ मनोरंजन करण्याऐवजी तो मनाच्या जखमा बरे करणारे माध्यम होऊ शकते याबाबतही विचार मांडले. यावेळी 'झूनी: लॉस्ट अँड फाउंड' नावाचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ दाखवण्यात आला, ज्यामध्ये स्वप्ने, अडथळे आणि चित्रपटाची पुनर्कल्पना करण्याच्या आशेचा पिता-पुत्राचा प्रवास दाखवण्यात आला.
प्रश्नोत्तरांच्या सत्रादरम्यान, काश्मीरचा गाण्यांसाठी पार्श्वभूमी म्हणून वापर करण्याऐवजी काश्मीरच्या खऱ्या संस्कृतीचे प्रतिबिंबित करणारे चित्रपट पुनरुज्जीवित करण्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाला मुझफ्फर अली यांनी खात्रीपूर्वक उत्तर दिले: 'झूनी' हा असाच चित्रपट होता. "काश्मीरमध्ये सर्व काही आहे, तुम्हाला बाहेरून प्रतिभा आमंत्रित करण्याची गरज नाही, तुम्हाला तिथेच ती वाढवायची आहे."
सत्र संपता संपता प्रेक्षकांना जाणवले की त्यांनी एक समाजच नाही तर वर्षाच्या हस्तांतरणाचा एक जिवंत क्षण पाहिला आहे, जिथे चित्रपटाचा वारसा, स्वप्ने, संघर्ष आणि कला एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे अतिशय काळजीपूर्वक, प्रेमाने आणि आशेने पोहोचता केला जात होता.
इफ्फी बद्दल अधिक माहिती
1952 मध्ये सुरू झालेला, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी हा दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि सर्वात भव्य चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ( एन एफ डी सी ) माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि गोवा राज्य सरकारच्या मनोरंजन सोसायटी (इ एस जी ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा महोत्सव आता जागतिक चित्रपटसृष्टीतील एक तेजस्वी व्यासपीठ बनला आहे - जिथे पुनर्संचयित क्लासिक्स, धाडसी प्रयोग आणि प्रथितयश कलाकार निर्भय नवीन कलाकारांसह एकत्र येतात. इफ्फी’ला खरोखरच तेजस्वी व्यासपीठ बनवणारी गोष्ट म्हणजे त्याचे लुकलुकते मिश्रण - ज्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक प्रदर्शने, मास्टरक्लासेस, दिग्गज कलाकारांना अभिवादन आणि उर्जावान वेव्हज फिल्म बाजार यांचा समावेश आहे, आणि जिथे नविन कल्पना जन्म घेतात, सौदे होतात आणि सहयोग घडून येतात. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्याच्या देखण्या किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर आयोजित होत असलेल्या इफ्फी’च्या 56व्या आवृत्तीत अनेक भाषा, शैली, नवोन्मेष आणि नवे आवाज यांचा झगमगता संगम पाहायला मिळणार आहे , जो भारतीय सर्जनशीलतेच्या जागतिक तेजाचा एक भव्य उत्सव आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56new/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2192611
| Visitor Counter:
8