पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी चार कामगार संहितांच्या अंमलबजावणीचे केले स्वागत
स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात व्यापक आणि प्रगतीशील कामगार-केंद्रित सुधारणांपैकी ही एक सुधारणा आहे आणि व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देते: पंतप्रधान
या संहिता सार्वत्रिक सामाजिक सुरक्षेसाठी एक भक्कम पाया म्हणून काम करतील: पंतप्रधान
कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणारी आणि भारताच्या आर्थिक विकासाला बळकटी देणारी भविष्यासाठी सज्ज परिसंस्था त्या तयार करतील : पंतप्रधान
या सुधारणा रोजगार निर्मितीला चालना देतील, उत्पादकता वाढवतील आणि विकसित भारताच्या दिशेने आपल्या प्रवासाला गती देतील : पंतप्रधान
Posted On:
21 NOV 2025 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार कामगार संहितांच्या अंमलबजावणीचे स्वागत केले असून स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात व्यापक आणि प्रगतीशील कामगार-केंद्रित सुधारणांपैकी एक असे या सुधारणांचे वर्णन केले आहे. ते म्हणाले की, या सुधारणा कामगारांना मोठ्या प्रमाणात सक्षम बनवतील आणि अनुपालन लक्षणीयरीत्या सोपे करून 'व्यवसाय सुलभते'ला प्रोत्साहन देतील.
पंतप्रधानांनी नमूद केले की, या चार कामगार संहिता सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा, किमान आणि वेळेवर वेतन देणे, कामाची सुरक्षित ठिकाणे आणि लोकांसाठी, विशेषतः नारी शक्ती आणि युवा शक्तीसाठी मोबदल्याच्या संधींसाठी एक मजबूत पाया म्हणून काम करतील.
मोदी पुढे म्हणाले की, या सुधारणांमुळे कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणारी आणि भारताच्या आर्थिक विकासाला बळकटी देणारी भविष्यासाठी सज्ज परिसंस्था निर्माण होईल. त्यांनी नमूद केले की, यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल , उत्पादकता वाढेल आणि विकसित भारताच्या दिशेने देशाच्या प्रवासाला गती मिळेल.
एक्स वरील पोस्टच्या मालिकेत मोदी म्हणाले;
“श्रमेव जयते!
आज,आमच्या सरकारने चार कामगार संहिता लागू केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात व्यापक आणि प्रगतीशील कामगार-केंद्रित सुधारणांपैकी त्या एक आहेत . या सुधारणा कामगारांना मोठ्या प्रमाणात सक्षम बनवतात आणि अनुपालन लक्षणीयरीत्या सोपे करून 'व्यवसाय सुलभते'ला प्रोत्साहन देतात .
#श्रमेव_जयते
#श्रमेवजयते
https://www.pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=2192463”
“या संहिता सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा, किमान आणि वेळेवर वेतन देणे, कामाची सुरक्षित ठिकाणे आणि लोकांसाठी, विशेषतः नारी शक्ती आणि युवा शक्तीसाठी मोबदल्याच्या संधींसाठी एक मजबूत पाया म्हणून काम करतील.”
“त्या भविष्यासाठी सज्ज परिसंस्था तयार करतील , जी कामगारांच्या हक्कांचे रक्षण करेल आणि भारताच्या आर्थिक विकासाला बळकटी देईल. या सुधारणा रोजगार निर्मितीला चालना देतील, उत्पादकता वाढवतील आणि विकसित भारताच्या दिशेने आपल्या प्रवासाला गती देतील.”
सुवर्णा बेडेकर /सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2192607)
Visitor Counter : 14