ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
डार्क पॅटर्न्स समाप्त करण्यासाठी 26 प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनी स्वयं लेखा परीक्षण नियमांचे पालन करण्याची घोषणा
Posted On:
20 NOV 2025 2:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2025
डिजिटल बाजारपेठेत ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, 26 आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी डार्क पॅटर्न प्रतिबंध आणि नियमन मार्गदर्शक तत्त्वे, 2023 चे पालन करण्यासंदर्भात स्वयंस्फूर्तीने स्व-घोषणा पत्रे सादर केली आहेत. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या किंवा त्यांना प्रभावित करणाऱ्या फसव्या ऑनलाइन डिझाइन पद्धतींना आळा घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
या प्लॅटफॉर्मनी डार्क पॅटर्न्सची उपस्थिती ओळखण्यासाठी, त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यांचे उच्चाटन करण्यासाठी अंतर्गत स्वयं लेखा परीक्षण किंवा तृतीय-पक्षीय लेखा परीक्षण केले असून त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कोणतेही डार्क पॅटर्न्स नाहीत आणि ते कोणत्याही प्रकारचे ग्राहकांना दिशाभूल करणारे किंवा त्यांना फसवणारे युजर इंटरफेस डिझाइन वापरत नाहीत, असे सर्व २६ कंपन्यांनी जाहीर केले आहे.
उद्योगजगताच्या अशाप्रकारच्या सक्रिय अनुपालनामुळे ग्राहकांप्रती पारदर्शकता आणि निष्पक्ष व्यापार तसेच नैतिक डिजिटल परिसंस्थेविषयी दृढ बांधिलकी दिसून येते. त्याचप्रमाणे ग्राहकांचे संरक्षण आणि व्यवसाय वृद्धी एकाच वेळी शक्य असून त्यातून ब्रँड बद्दलचा विश्वास आणि दीर्घकालीन विश्वासार्हता निर्माण होते, असे या स्वयंस्फूर्तीने केलेल्या उपक्रमांतून दिसून येते.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण, सी सी पी ए ने याची दखल घेतली असून त्याला उद्योगातील सर्वोत्तम पद्धत असे संबोधले आहे.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण, सी सी पी ए ने या घोषणापत्राचे कौतुक केले असून अशाप्रकारचे स्वनियंत्रण राखण्यासाठी इतर उद्योगांसाठी हे एक आदर्श उदाहरण असल्याचे म्हटले आहे. कंपन्यांनी आपले स्व लेखा परीक्षणाचे घोषणापत्र प्रामुख्याने त्यांच्या संकेतस्थळावर अपलोड करावे ज्यामुळे लोकांना ते बघता येईल, असे निर्देश प्राधिकरणाने यापूर्वी दिले होते.
ही घोषणापत्रे सी सी पी ए च्या https://www.doca.gov.in/ccpa/slef-audit-companies-dark-pattern.php या संकेतस्थळावर देखील पाहता येतील:
इतर सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, बाजारपेठ संस्था, सेवा प्रदाते आणि अॅप डेव्हलपर्स यांनी या कंपन्यांनी घालून दिलेल्या उदाहरणाचे अनुकरण करावे असे आवाहन सी सी पी ए ने केले आहे. ग्राहकांची फसवणूक करण्याच्या पद्धती या कमी काळ टिकणाऱ्या पद्धती असून त्यामुळे दीर्घ कालावधीत ग्राहक आणि उद्योग या दोघांचे नुकसान होते, हे भारताच्या डिजिटल परिसंस्थेत कार्यरत असणाऱ्या प्रत्येक उद्योगाने समजून घेणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (एनसीएच), समाज माध्यम मोहिमा, माहितीपूर्ण व्हिडिओ आणि जनसंपर्क कार्यक्रमांद्वारे ग्राहकांना डार्क पॅटर्न्स नमुने ओळखण्याबद्दल आणि त्यांची तक्रार करण्याबद्दल प्रशिक्षण दिले आहे. या तक्रारींचे निवारण पद्धतशीरपणे केले जाते आणि जिथे आवश्यकता असेल तिथे योग्य ती कारवाई केली जाते. अशा प्रकारच्या संभाव्य उल्लंघन प्रकारांकडे सी सी पी ए बारीक लक्ष ठेवून आहे आणि कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासाठी मागेपुढे पहिले जाणार नाही, असे सांगितले आहे.
पार्श्वभूमी
30 नोव्हेंबर 2023 रोजी अधिसूचित केलेल्या डार्क पॅटर्न्सच्या प्रतिबंध आणि नियमनासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वे, 2023 मध्ये खालीलप्रमाणे 13 डार्क पॅटर्न्सची ओळख करून त्यांवर बंदी घातली आहे:
- खोटी घाई निर्माण करणे
- वस्तू लपवणे/सेवा कार्टमध्ये घालणे
- नकार दिल्यास अपराधी वाटण्यास भाग पाडणे
- जबरदस्तीने कृती करवून घेणे
- सबस्क्रिप्शनच्या जाळ्यात अडकवणे
- जाणूनबुजून इंटरफेसमध्ये अडथळे निर्माण करून ग्राहकाची दिशाभूल करणे
- आकर्षक गोष्टी दाखवून नंतर वेगळेच उत्पादन/अटी देणे
- खरे दर लपवून शेवटच्या टप्प्यावरच अतिरिक्त शुल्क दाखवणे
- जाहिराती लपवून सामान्य सामग्रीसारख्या दाखवणे
- पुन्हा-पुन्हा त्रासदायक पॉप-अप्स पाठवणे
- भूलवणारी किंवा गोंधळात टाकणारी शब्दरचना वापरणे
- सॉफ्टवेअर-एज-अ-सर्व्हिससाठी अस्पष्ट, अवघड किंवा दिशाभूल करणारी बिलिंग पद्धती वापरणे
- फसवे/दुष्ट सॉफ्टवेअर किंवा खोटे सुरक्षा अलर्ट दाखवून कृती करवून घेणे
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत जारी केलेली ही मार्गदर्शक तत्त्वे पारदर्शक, विश्वासार्ह आणि ग्राहक-केंद्रित डिजिटल बाजारपेठ तयार करण्याच्या सरकारच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
याचे अनुपालन अधिक मजबूत करण्यासाठी, सी सी पी ए ने 5 जून 2025 रोजी मार्गदर्शक तत्वे जारी केली असून यामध्ये सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन सेवा प्रदात्यांना पुढीलः
List of Platforms That Submitted Self-Audit Declarations as follows:
- Page Industries (Jockey, Speedo) – Self-audit conducted; platform free from dark patterns.
- William Penn Pvt. Ltd. (Sheaffer, Lapis Bard) – Self-audit conducted; no dark patterns detected.
- Pharm Easy (Axelia Solutions Pvt. Ltd.) – Internal audit confirms compliance with guidelines.
- Zepto Marketplace Pvt. Ltd. – Platform UI/UX audited; ongoing monitoring in place.
- Curaden India (Curaprox) – Self-audit confirms absence of dark patterns.
- Duroflex Pvt. Ltd. – Self-audit confirms platform compliance.
- Flipkart Internet Pvt. Ltd. – Third-party audit confirms no dark patterns.
- Myntra Designs Pvt. Ltd. – Third-party audit confirms compliance.
- Cleartrip Pvt. Ltd. – Third-party audit confirms platform is dark-pattern-free.
- Walmart India Pvt. Ltd. – Third-party audit concludes no dark patterns.
- MakeMyTrip (India) Pvt. Ltd. – Declared platforms require explicit consumer consent; no pre-ticked boxes.
- BigBasket (Innovative Retail Concepts Pvt. Ltd.) – Internal review completed; remedial measures implemented.
- Tira Beauty (Reliance Retail Ltd.) – Internal review confirms compliance.
- JioMart (Reliance Retail Ltd.) – Platform declared free of dark patterns; continued monitoring.
- Reliance Jewels – Declared fully compliant.
- Ajio – No dark patterns; ongoing platform checks.
- Reliance Digital – Internal review ensures full compliance.
- Netmeds – Declared free of dark patterns.
- Hamleys – Internal review confirms compliance.
- MilBasket – Platform declared compliant.
- Swiggy Ltd. – Self-audit completed; committed to enhancing consumer experience.
- Tata 1mg – Comprehensive self-audit; platform designed for consumer-centric behaviour.
- Zomato – Internal assessment aligns platform with CCPA advisory.
- Blinkit – Internal review affirms transparent, responsible design.
- Ixigo – Declared free of dark patterns, adhering to highest compliance standards.
- Meesho Ltd. – Declared free from all 13 CCPA-identified dark patterns; regular self-checks ongoing.
* * *
गोपाळ चिप्पलकट्टी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2192039)
Visitor Counter : 19