अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सौदी अरेबियातील मदिनाजवळ काल रात्री उशिरा उमरा यात्रेकरूंशी संबंधित घडलेल्या एका दुःखद बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर जेद्दाह येथील भारतीय महावाणिज्य दूतावासात 24x7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे


केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, आम्ही दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत जे अधिक माहिती गोळा करत आहेत आणि शक्य ती सर्व मदत करत आहेत

Posted On: 17 NOV 2025 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 नोव्हेंबर 2025

 

सौदी अरेबियातील मदिनाजवळ काल रात्री उशिरा उमरा यात्रेकरूंशी संबंधित घडलेल्या एका दुःखद बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर, जेद्दाह येथील भारतीय महावाणिज्य दूतावासात 24x7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शोकाकुल कुटुंबांप्रति तीव्र संवेदना व्यक्त केल्या आणि या कठीण काळात हे सहन करण्याची शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना केली.

हेल्पलाइनचे संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहेत:

8002440003 (टोल फ्री ),

00966122614093, 00966126614276

00966556122301 (WhatsApp).

केंद्रीय मंत्री रीजिजू म्हणाले की, आम्ही आमच्या दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत जे अधिक माहिती गोळा करत आहेत आणि  शक्य ती सर्व मदत करत आहेत. रियाधमधील दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास देखील सौदी हज आणि उमरा मंत्रालय आणि इतर स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. वाणिज्य दूतावासातील कर्मचारी आणि भारतीय समुदाय स्वयंसेवकांचे एक पथक विविध रुग्णालये आणि अन्य ठिकाणी उपस्थित आहे.

रियाधमधील दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास पूर्ण सहकार्य करत आहेत. संबंधित कुटुंबांशी समन्वय साधण्यासाठी दूतावास आणि वाणिज्य दूतावासाचे अधिकारी तेलंगणा राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2190847) Visitor Counter : 12