पंतप्रधान कार्यालय
गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमातील क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक
प्रविष्टि तिथि:
15 NOV 2025 10:23PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमातील क्षणचित्रे सामायिक केली आहेत .
एक्स, या समाजमाध्यमांवरील स्वतंत्र संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
"गुजरातच्या देडियापाडा येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करून मी गौरवान्वित झालो आहे. "
“जनजातीय गौरव दिनाच्या शुभ प्रसंगी गुजरातमध्ये देशभरातील आदिवासी वारसा प्रदर्शित करणाऱ्या जिवंत सांस्कृतिक सादरीकरणाने प्रत्येकाचे मन मोहित केले आहे. "
"देडियापाडामध्ये आदिवासी समुदायाच्या मुलांना सुलभ आणि सुरक्षित शिक्षण मिळावे, यासाठी भगवान बिरसा मुंडा आदिवासी परिवहन बसेसना हिरवा झेंडा दाखवण्याचे सौभाग्य मला मिळाले."
"गुजरातमधील देडियापाडाच्या विकास कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या माझ्या बंधू-भगिनींचा जोश आणि उत्साह सांगतो की आमच्या आदिवासी समुदायांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांबाबत ते किती आनंदी आहेत."
"भगवान रामाशी निगडीत आपल्या आदिवासी समुदायाला, काँग्रेसने वाऱ्यावर सोडून दिले होते. मात्र रालोआ सरकार शिक्षण, आरोग्य, निवारा आणि संपर्कजाळे यांसारख्या सोयी- सुविधांसह त्यांचे आयुष्य सुलभ करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.''
"मी भगवान बिरसा मुंडा यांच्या गावातली माती कपाळावर लावून आपल्या आदिवासी बंधू -भगिनींच्या कल्याणाचा संकल्प केला आहे. पीएम-जनमन योजना आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्षसारख्या अभियानांमधून हे संकल्प साकार होत आहेत."
"आम्ही आमच्या आदिवासी बंधू- भगिनींच्या जीवनमानाचा स्तर आणखी सुधारण्यासाठी, त्याच्याशी निगडीत प्रत्येक पैलूचा विचार करत काम करीत आहोत. याचे एकच नाही तर अनेक उदाहरणे आहेत..."
***
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2190510)
आगंतुक पटल : 28
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam