गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मोदी सरकारच्या अंमली पदार्थ विरोधात शून्य सहिष्णुता भूमिकेला बळकटी देणारी मोठी कारवाई, एनसीबी आणि राजस्थान पोलिसांनी राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील एका दुर्गम गावात एक गुप्त प्रयोगशाळेचा केला पर्दाफाश

Posted On: 15 NOV 2025 4:05PM by PIB Mumbai

 

मोदी सरकारच्या अंमली पदार्थांच्या विरोधात शून्य सहिष्णुता धोरणाला बळकटी देणारी मोठी कारवाई करत अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) आणि राजस्थान पोलिसांनी राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील एका दुर्गम गावात एका गुप्त प्रयोगशाळेचा पर्दाफाश केला.

या कारवाईत शेकडो किलो रसायने जप्त करण्यात आली आहेत, ज्यातून सुमारे 100 किलो मेफेड्रोन तयार करता आले असते. या रसायन साठ्याची किंमत सुमारे 40 कोटी रुपये आहे. या प्रकरणात सूत्रधार आणि इतर 4 जणांना अटक करण्यात आली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये मेफेड्रोनचा वापर मनावर परिणाम करणारा घटक म्हणून वाढत्या प्रमाणात होत आहे.

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने विशेष करून राजस्थानमधील जिल्हा पोलिसांना जाणकार बनवण्यासाठी मासिक जिल्हास्तरीय एनसीओआरडी बैठकींचा प्रभावी वापर केला. राज्य पोलिसांना ही माहिती देण्यात आली की एखाद्या ठिकाणी रसायनाने भरलेले ड्रम किंवा प्रयोगशाळेतील उपकरणे आढळल्यास ती कृत्रिम अमली पदार्थ विशेषतः मेफिट रूम तयार करण्यासाठी वापरली जाणारी गुप्त प्रयोगशाळा असू शकते. एनसीबीने देशभरातील जिल्हा पोलिसांसोबत गुप्त प्रयोगशाळांच्या उपस्थितीबद्दल लाल ध्वजांकित संकेत देखील सामायिक केले. यामध्ये खिडक्या झाकलेल्या किंवा काळे झालेल्या असणे; अतिरिक्त वायुवीजन/डक्टिंग; भिंती/जमिनीवर इमारती किंवा शेडवर धातूचा गंज किंवा रासायनिक डाग पडल्याची चिन्हे, पूर्वी निवासी असलेली परंतु आता प्रयोगशाळा म्हणून वापरल्या जाणाऱ्या जागा; असामान्य ठिकाणी रसायने किंवा उपकरणे साठवलेली आढळणे इत्यादींचा समावेश होता.

अशाच एका घटनेत, राजस्थानमधील सिरोही पोलिसांना 06.11.2025 रोजी राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील दांतराई गावातील एका दुर्गम फार्म हाऊसमध्ये प्रयोगशाळेतील उपकरणांसह रसायने असलेले ड्रम आणि पॅकेट आढळले. पोलिसांनी ही माहिती ताबडतोब एनसीबी, जोधपूरला दिली. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून गुप्त प्रयोगशाळेची प्राथमिक तपासणी केली असता तेथे गुप्त प्रयोगशाळेची स्पष्ट चिन्हे आढळली. तेथे शेकडो किलो रसायने आढळून आली जी सुमारे 100 किलो मेफेड्रोन तयार करण्यासाठी पुरेशी होती. या रसायनांची किंमत अंदाजे 40 कोटी रुपये असेल. गांधीनगर येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ (एनएफएसयू) च्या तज्ञ पथकाला तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. या तज्ञांनी घटनास्थळी आढळलेली सामग्री आणि उपकरणे मेफेड्रोन निर्मितीशी संबंधित असल्याला दुजोरा दिला.

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2190420) Visitor Counter : 3