दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बालदिनानिमित्त बीएसएनएलने सादर केला विद्यार्थ्यांसाठी समर्पित मोबाइल प्लॅन

Posted On: 14 NOV 2025 3:30PM by PIB Mumbai

 

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या भारतातील अग्रगण्य सरकारी दूरसंचार सेवा पुरवठादाराने बालदिनानिमित्त, विद्यार्थ्यांसाठी समर्पित डेटा पॅक्ड मोबाइल  प्लॅन   सादर केला आहे.

विद्यार्थ्यांसाठीचा हा  प्लॅन  14 नोव्हेंबर 2025 ते 13 डिसेंबर 2025 या कालावधीत सुरू राहील.

केवळ 251 रुपयांच्या या  प्लॅनची पुढील वैशिष्ट्ये आहेत:

· हाय स्पीड 100 जीबी डेटा

· अमर्यादित व्हॉईस कॉल

· दररोज 100 एसएमएस

· वैधता 28 दिवस

विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या योजनेची घोषणा करताना, बीएसएनएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ए. रॉबर्ट जे. रवी म्हणाले:

बीएसएनएलने अलीकडेच देशभरात अत्याधुनिक मेक इन इंडिया 4G मोबाइल नेटवर्क सुरू केले आहे. 4G मोबाइल नेटवर्क तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील केवळ 5 वा देश आहे, आणि बीएसएनएल गेल्या काही काळापासून त्याचा विकास आणि अंमलबजावणीमध्ये सक्रियपणे कार्यरत आहे.

ते पुढे म्हणाले की, मोठ्या डेटा पॅक्ड प्लॅनमुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण 28 दिवसांच्या कालावधीसाठी  100 जीबीपर्यंत डेटा वापरता येईल, आणि देशांतर्गत विकसित 4G मोबाइल नेटवर्कचा अनुभव घेण्याची अभिमानास्पद संधी मिळेल. शैक्षणिक कामांसाठी मोठ्या प्रमाणात डेटाची आवश्यकता आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना एक अतिशय स्पर्धात्मक आणि किफायतशीर ऑफर आहे. एकदा त्यांनी नवीन बीएसएनएल 4G डेटा सेवेचा अनुभव घेतल्यावर आम्ही अपेक्षा करतो, की ते  दीर्घ काळ आमच्याशी जोडले जातील, कारण बीएसएनएल उत्कृष्ट सेवा गुणवत्ता आणि कव्हरेजची हमी देऊ शकते.

विद्यार्थी प्लॅनबाबत अधिक माहितीसाठी:

जवळच्या बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्राला (सीएससी) भेट द्या, 1800-180-1503 डायल करा अथवा (bsnl.co.in) या संकेतस्थळाला भेट द्या.

***

सोनाली काकडे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2190238) Visitor Counter : 5