माध्यमांसाठी शेवटची संधी: 56 व्या इफ्फीसाठी माध्यम अधिस्वीकृती पोर्टल 17 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पुन्हा उघडले
माध्यमकर्मींकडून होणारी मोठी मागणी लक्षात घेता, 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (IFFI) मीडिया अधिस्वीकृती पोर्टल आज सायंकाळी 7 वाजल्या पासून आणखी तीन दिवसांसाठी पुन्हा उघडण्यात येत आहे.
यामुळे आशियातील या सर्वात प्रतिष्ठित चित्रपट सोहळ्याचे वार्तांकन करू इच्छिणाऱ्या पत्रकारांना मीडिया प्रतिनिधी म्हणून नोंदणी करता येईल.
अधिकृत पोर्टलद्वारे आताच नोंदणी करा:
https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx
इफ्फीची 56 वी आवृत्ती 20–28 नोव्हेंबर 2025 दरम्यान पणजी, गोवा येथे आयोजित केली जाणार आहे. अधिस्वीकृत माध्यम व्यावसायिकांना चित्रपट स्क्रिनिंग, पॅनेल चर्चा, मास्टर क्लासेस, रेड-कार्पेट कार्यक्रम आणि जगभरातील आघाडीचे चित्रपट निर्माते आणि कलाकारांसोबत नेटवर्किंगच्या संधींसाठी विशेष प्रवेश मिळेल.
माध्यमकर्मींना सूचित करण्यात येते की, हे पोर्टल 17 नोव्हेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत खुले राहील.
अर्जदारांनी पोर्टलवरील सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे आणि वैध आणि व्यावसायिक ओळखपत्रांसह सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. सविस्तर पात्रता अटी आणि कागदपत्रांविषयीच्या मार्गदर्शक सूचना अधिस्वीकृती संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
इफ्फी मीडिया अधिस्वीकृती धोरण देखील येथे पाहता येईल.
कोणतीही मदत किंवा शंकांसाठी, पत्रकार पीआयबी इफ्फी मीडिया सपोर्ट डेस्कशी खालील मेल पत्त्यावर संपर्क साधू शकतात:
iffi.mediadesk@pib.gov.in
आशियाच्या या भव्य चित्रपट मंचाचा भाग होण्याची शेवटची संधी गमावू नका—आजच अर्ज करा आणि इफ्फी 2025 साठी तुमची अधिस्वीकृती निश्चित करा.
***
सुषमा काणे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Release ID:
2190187
| Visitor Counter:
11