सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बटाटा मूल्य साखळी बळकट करण्यासाठी बनास डेअरी आणि भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार


Posted On: 13 NOV 2025 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 नोव्हेंबर 2025

 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार से समृद्धी या दृष्टिकोनापासून प्रेरणा घेऊन, केला गेलेला हा सामंजस्य करार सहकारी संस्थांममधील परस्पर सहकार्याच्या संकल्पनेला नवी दिशा देत आहे.
  • बटाट्याच्या पिकासाठी एक सर्वसमावेशक बियाणे ते बाजारपेठ या तत्वावर आधारित मूल्य साखळी स्थापित करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार से समृद्धी हा दृष्टिकोन प्रत्यक्षात साकार करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात सहकारी संस्थांमधील परस्पर सहकार्य या संकल्पेअंतर्गत अनेक उपक्रमांना प्रोत्साहन देत, आणि या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने, बनास डेअरी अर्थात बनास दुग्धव्यवसाय संस्था (अमूलचाच एक भाग आणि आशियातील सर्वात मोठी सहकारी डेअरी अर्थात दुग्ध व्यवसाय संस्था) आणि भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड मध्ये, बटाट्यांच्या उच्च गुणवत्तेच्या बियाण्यांची निर्मिती  आणि वितरणासाठी एक सामंजस्य करार केला गेला आहे. दि. 10 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीमधील अटल अक्षय ऊर्जा भवनात, केंद्रीय सहकार सचिव डॉ. आशिष कुमार भूतानी आणि बनास डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक संग्राम चौधरी तसेच भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक चेतन जोशी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या गेल्या.

   

यावेळी सहकार सचिव डॉ. आशिष कुमार भूतानी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मूल्य साखळ्यांचे बळकटीकरण आणि उत्पादकतेत वाढ साध्य करून, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि समृद्धी घडवून आणण्याच्या दृष्टीने ही भागीदारी म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.

बटाट्याच्या पिकासाठी एक सर्वसमावेशक बियाणे ते बाजारपेठ या तत्वावर आधारित मूल्य साखळी स्थापित करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे. यामुळे बटाटा पिकाच्या प्रमाणित, रोगमुक्त बियाण्याच्या उत्पादनाची सुनिश्चिती होईल, आणि त्याच वेळी विज्ञाननिष्ठ लागवड पद्धती, कंत्राटी शेतीची व्यवस्था आणि बाजारपेठांसोबतची कार्यक्षम जोडणी या बाबींनाही चालना मिळू शकणार आहे. या उपक्रमाअंतर्गत तंत्रज्ञानाधारित नवोन्मेष आणि सहकार क्षेत्राच्या क्षमतांचा मिलाफ घडवून आणत,  उत्पादकतेतील वाढ, निविष्ठांमधील नुकसानीत घट, आणि मूल्य साखळीतील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची वाढ तसेच लवचिकतेच्या व्याप्तीचा विस्तार केला जाणार आहे. या सामंजस्य करारानुसार, भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड बनास डेअरीच्या ऊती संवर्धन आणि एरोपोनिक सुविधा केंद्रांचा वापर करणार आहे, तर बनास डेअरीच्या वतीने तंत्रज्ञानविषयक आणि बाजारपेठांच्या उपलब्धतेचे पाठबळ पुरवले जाणार आहे. 

यावेळी बनास डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक संग्राम चौधरी यांनी बनास डेअरीने आपल्या कार्यक्षेत्राचा दुग्ध व्यवसायापलीकडे केलेल्या विस्तारासंबंधीची माहिती दिली. तर भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक चेतन जोशी यांनी बटाटा बियाण्यांमध्ये आत्मनिर्भरता वाढवण्याची गरज अधोरेखित केली.

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2189618) Visitor Counter : 10