गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच्या स्फोट स्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेल्या ठिकाणाला भेट देऊन घेतला परिस्थितीचा आढावा
गृहमंत्र्यांनी लोक नायक जय प्रकाश रुग्णालयात जाऊन स्फोटात जखमी झालेल्या लोकांची घेतली भेट
या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू केला आहे - केंद्रीय गृहमंत्री
या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीसांचा विशेष कक्ष, गुन्हे शाखा, राष्ट्रीय तपास यंत्रणा, राष्ट्रीय सुरक्षा दल आणि न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळेची पथके घटनास्थळी पोहोचली असून, स्फोटाचे कारण शोधण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहेत - केंद्रीय गृहमंत्री
स्फोटाची बातमी मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून घटनेचा आढावा घेतल्याची गृहमंत्र्यांची माहिती
आम्ही या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करत आहोत आणि घटनास्थळावरून गोळा केलेल्या पुराव्यांचे संपूर्ण विश्लेषण होईपर्यंत कोणतीही शक्यता नाकारत नाही - केंद्रीय गृहमंत्री
Posted On:
10 NOV 2025 11:37PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेल्या ठिकाणाला भेट दिली, आणि परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली.
यानंतर अमित शाह यांनी लोक नायक जय प्रकाश रुग्णालयालाही भेट दिली. तिथे त्यांनी या स्फोटात जखमी झालेल्या लोकांशी भेट घेतली. त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधून जखमींच्या प्रकृतीबद्दल विचारपूसही केली.
या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीसांचा विशेष कक्ष, गुन्हे शाखा, राष्ट्रीय तपास यंत्रणा, राष्ट्रीय सुरक्षा दल आणि न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळेची पथके घटनास्थळी पोहोचली, स्फोटाच्या कारणाचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहेत असेही त्यांनी नमूद केले.
या स्फोटाची बातमी मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून घटनेचा आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या सर्व बाजूंनी तपास सुरू आहे आणि घटनास्थळावरून गोळा केलेल्या पुराव्यांचे विश्लेषण होईपर्यंत कोणतीही शक्यता नाकारली जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
***
JaydeviPujariSwami/TusharPawar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2188622)
Visitor Counter : 27