गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी नवी दिल्लीतील यशोभूमी येथे राष्ट्रीय शहरी परिषद 2025 चे केले उद्घाटन

Posted On: 08 NOV 2025 4:33PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी आज नवी दिल्लीतील यशोभूमी येथे राष्ट्रीय शहरी परिषद 2025 चे उद्घाटन केले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत धोरणकर्ते, शहरी नियोजक, तज्ञ आणि भागधारक एकत्रित येऊन "शाश्वत शहरी विकास आणि प्रशासन" या विषयावर सहा संकल्पनात्मक क्षेत्रांमध्ये सखोल चर्चा आणि विचारमंथन करणार आहेत.

तपशील पाहण्यासाठी आणि सत्रे थेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विकसित भारत शहरप्रदर्शन

याप्रसंगी केंद्रीय मंत्र्यांनी विकसित भारत शहरप्रदर्शनाचेही उद्घाटन केले. या प्रदर्शनात संपूर्ण विकसित, चैतन्यशील, समावेशक, शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज भारतीय शहरया संकल्पनेचे दर्शन घडवण्यात आले आहे. प्रदर्शनात भारतीय शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या नवोन्मेषी शहरी नियोजन पद्धती, स्मार्ट तंत्रज्ञान आणि नागरिक-केंद्रित पायाभूत सुविधा प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

डंपसाईट रिमेडिएशन अ‍ॅक्सिलरेटर प्रोग्राम (DRAP) चा प्रारंभ

केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी डंपसाईट रिमेडिएशन अ‍ॅक्सिलरेटर प्रोग्राम (DRAP) उपक्रमाचा प्रारंभ केला - हा एक वर्षभर चालणारा पथदर्शी उपक्रम आहे, जो शहरी भारतातील उर्वरित डंपसाईटच्या दुरुस्तीचे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचा हेतू शहरी भागातील मोलाची जमीन परत मिळवून ती समुदाय आणि पायाभूत विकासासाठी वापरणे हा आहे. यामुळे सप्टेंबर 2026 पर्यंत "लक्ष्य शून्य डंपसाईट" साध्य करण्याच्या भारताच्या संकल्पनेला गती मिळेल.

 डंपसाईट रिमेडिएशन अ‍ॅक्सिलरेटर प्रोग्राम’च्या अधिक तपशीलांसाठी येथे क्लिक करा 

डंपसाईट रिमेडिएशन अ‍ॅक्सिलरेटर प्रोग्रामशी संबंधित वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

स्वच्छ भारत मिशन - ज्ञान व्यवस्थापन युनिट (KMU)

या कार्यक्रमात मंत्र्यांनी स्वच्छ भारत मिशन - ज्ञान व्यवस्थापन युनिट (KMU) चा देखील प्रारंभ केला. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA) राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्थेत (NIUA) स्थापन केलेले हे युनिट देशभरातील क्षमता विकास, ज्ञाननिर्मिती आणि संस्थात्मक शिक्षणासाठी एक राष्ट्रीय मंच म्हणून कार्य करेल. हे युनिट स्वच्छ भारत मिशन - शहरी भागच्या चौकटीत ज्ञानविनिमय आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

ज्ञान व्यवस्थापन युनिट (KMU) बद्दलच्या तपशीलांसाठी येथे क्लिक करा

अर्बन इन्व्हेस्ट विंडो (UiWIN) चे उद्घाटन

या प्रसंगी सुरू करण्यात आलेला आणखी एक प्रमुख उपक्रम म्हणजे अर्बन इन्व्हेस्ट विंडो. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) मार्गदर्शनाखाली हुडको (HUDCO) द्वारे विकसित केलेले हे व्यासपीठ भारतीय शहरांसाठी एक वन स्टॉप गुंतवणूक सुविधा मंच म्हणून काम करेल. हे व्यासपीठ खाजगी गुंतवणूक आकर्षित करणे तसेच जागतिक बँक आणि आशियाई विकास बँक सारख्या बहुपक्षीय संस्थांकडून दीर्घकालीन, सवलतीच्या आणि स्पर्धात्मक वित्त पुरवठ्याची सुविधा प्रदान करण्यासाठी तयार केले आहे. शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी हे व्यासपीठ सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP)-आधारित शहरी प्रकल्पांना देखील प्रोत्साहन देईल.

अर्बन इन्व्हेस्ट विंडोच्या अधिक तपशीलांसाठी येथे क्लिक करा

जल ही जननीगीताचे लोकार्पण

मनोहर लाल यांनी दैनंदिन जीवनात पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 'जल ही जननी' या अमृत अभियानासाठीच्या गाण्याचे लोकार्पण केले. भविष्यासाठी पाणी वाचवण्याचे आवाहन या गीतात केलेले आहे.

केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांचे भाषण

भारताचे शहरी परिवर्तन शाश्वतता, समावेशकता आणि नवोन्मेषावर आधारित असले पाहिजे, यावर केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी या प्रसंगी बोलताना भर दिला. डंपसाईट रिमेडिएशन अ‍ॅक्सिलरेटर प्रोग्राम (DRAP), अर्बन इन्व्हेस्ट विंडो (UiWIN) आणि ज्ञान व्यवस्थापन युनिट (KMU) सारख्या उपक्रमांमुळे स्वच्छ, हरीत आणि राहण्यायोग्य शहरे निर्माण करण्यास मदत होईल, जी विकसित भारत @2047 च्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.

परिषदेच्या पहिल्या दिवशी चार उपसत्रे झाली, ज्यात गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या विषयांवर भाषणे दिली. पहिले सत्र प्रादेशिक नियोजन, संक्रमण-केंद्रित विकास (TOD) आणि शहरातील गतिशीलता यावर केंद्रित होते. दुसऱ्या सत्रात उपजीविकेच्या संधी आणि गरिबी निर्मूलनावर प्रकाश टाकण्यात आला. तिसरे सत्र बांधकाम आणि पाडकामातील कचरा व्यवस्थापन या तांत्रिक विषयावर आधारित होते. चौथे आणि शेवटचे सत्र क्षमता विकास या विषयावर केंद्रित होते.

***

माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2187839) Visitor Counter : 9