वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी रोमेनियाच्या परराष्ट्रमंत्री ओना सिल्विया त्सोएयू (Oana-Silvia Țoiu) यांच्याबरोबर घेतली द्विपक्षीय बैठक
Posted On:
04 NOV 2025 9:49AM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी रोमेनियाच्या परराष्ट्रमंत्री ओना सिल्विया त्सोएयू (Oana-Silvia Țoiu) यांच्याबरोबर बुखारेस्ट येथे आज द्विपक्षीय बैठक घेतली. व्यापाराचा विस्तार करणे, गुंतवणूक आकर्षून घेणे, आणि भारत-युरोपीय महासंघ यांदरम्यान अधिक व्यापक चौकटीत पुरवठा साखळ्या बळकट करणे- या मुद्द्यांना प्राधान्य देत यावेळी चर्चा झाली.
सध्या सुरु असलेल्या वाटाघाटींसाठी नियत राजकीय दिशेला अनुरूप पद्धतीने भारत- युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराला या वर्षात एक न्याय्य, संतुलित आणि परस्पर-हितकारी असे अंतिम स्वरूप देण्यासाठी काम करण्यावर दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली.
उभय देशांदरम्यान व्यापार आणि गुंतवणूक या बाबतींत असलेल्या स्थिर संबंधांचा दोन्ही मंत्र्यांनी आढावा घेतला. भारताकडून रोमेनियाला होत असलेली निर्यात आर्थिक वर्ष 2024–25 दरम्यान 1.03 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार करून गेली. तर आर्थिक वर्ष 2023–24 मध्ये एकंदर द्विपक्षीय व्यापार 2.98 अब्ज अमेरिकी डॉलरच्या घरात पोहोचला.
पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, औषधनिर्माण आणि सिरेमिक यासारख्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये पुरवठा-साखळी संबंध अधिक दृढ करण्यास आणि दोन्ही बाजूंनी बाजारपेठेत प्रवेश वाढविण्यासाठी मानके, चाचणी आणि गुंतवणूक भागीदारीमध्ये सहकार्य सुलभ करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. उत्पादनाच्या विविधतेसाठी एकत्र काम करण्यास आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून मजबूत, अधिक लवचिक पुरवठा साखळी तयार करण्यास, दोन्ही राष्ट्रांमधील व्यवसायांसाठी स्थिरता आणि आत्मविश्वास सुनिश्चित करण्यास त्यांनी सहमती दर्शविली.
भारत आणि रोमानियाच्या नेतृत्वादरम्यान अलिकडच्या उच्चस्तरीय चर्चांच्या आधारे, दोन्ही बाजूंनी नियमित देवाणघेवाणीच्या वेलपत्रकाद्वारे ही गती कायम ठेवण्याचे मान्य केले. त्यांनी व्यापार सुव्यवस्थित करण्यासाठी, गतिशीलता टूलकिट विकसित करण्यासाठी आणि संधींचे मूर्त परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी गुंतवणूकदारांपर्यंत पोहोच बळकट करण्यासाठी पाठपुरावा करण्यात समन्वय साधण्याचा निर्णय घेतला.
ही भेट दोन्ही देशांच्या मजबूत भारत-रोमानिया आर्थिक भागीदारीसाठी सामायिक वचनबद्धतेला अधोरेखित करते. अश्या भागीदारी व्यापार आणि गुंतवणुकीचा प्रवाह वाढवतात आणि दोन्ही अर्थव्यवस्थांच्या परस्पर फायद्यासाठी कौशल्य-आधारित गतिशीलतेसाठी मार्ग तयार करतात.
***
JaydeviPujariSwami/Jai/HemangiKanekar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186139)
Visitor Counter : 11