पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
                    
                    
                        
पीएमएनआरएफ मधून सानुग्रह मदतीची केली घोषणा
                    
                
                
                    Posted On:
                03 NOV 2025 6:49PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2025
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना देखील त्यांनी केली आहे.
या घटनेतील मृतांच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) 2 लाख रुपये तर प्रत्येक जखमी व्यक्तीला 50,000 रुपये देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेत काही जणांनी जीव गमावणे हे अत्यंत दुःखदायक आहे. या कठीण काळात प्रभावित झालेले लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी झालेल्या व्यक्ती लवकर बऱ्या होवोत अशी प्रार्थना करतो.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) या घटनेतील मृतांच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर प्रत्येक जखमी व्यक्तीला 50,000 रुपये देण्यात येतील: पंतप्रधान @narendramodi”
 
नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
 
 
                
                
                
                
                
                (Release ID: 2186003)
                Visitor Counter : 9
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam