ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        संजय गर्ग यांनी भारतीय मानक ब्युरोच्या महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                03 NOV 2025 6:29PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2025
भारतीय प्रशासनिक सेवेच्या 1994 तुकडीतील केरळ केडरमधील अधिकारी संजय गर्ग यांनी 1 नोव्हेंबर 2025 पासून भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
धोरणात्मक नियोजन,धोरणनिर्मिती तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कृषी, अन्न पुरवठा, संरक्षण, उद्योग क्षेत्र, औद्योगिक प्रोत्साहन, वित्त यासह विविध सामाजिक क्षेत्रांसह अनेक क्षेत्रांमध्ये कार्यान्वयन यामधल्या निपुणतेसह   गर्ग यांनी तीन दशकांहून अधिक काळ विस्तृत आणि वैविध्यपूर्ण प्रशासकीय सेवा बजावली आहे.
बीआयएसमध्ये महासंचालक म्हणून रुजू होण्यापूर्वी, त्यांनी कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग (डीएआरई) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) सचिव म्हणून काम पाहिले आहे.डीएआरई आणि आयसीएआर मध्ये, त्यांनी संशोधन व्यवस्थापन आणि प्रशासनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल परिवर्तनाचे नेतृत्व केले. कृषी शास्त्रज्ञांशी शेतकऱ्यांना थेट जोडणाऱ्या किसान सारथी पोर्टलचा वापर  आणि विस्तारातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बीआयएसचे महासंचालक या पदावरून, गर्ग हे आयईसीमधील भारताच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहतील.
निलीमा चितळे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
 
 
                
                
                
                
                
                (Release ID: 2185987)
                Visitor Counter : 16