पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी छत्तीसगड दौऱ्यातील काही अंश सामायिक केला आहे. यात आदिवासींचा अभिमान, विकास प्रवास आणि लोककल्याण यावर प्रकाश टाकण्यात आला आहे
Posted On:
01 NOV 2025 10:44PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड दौऱ्यातील आणखी काही अंश सामायिक केले आहेत, ज्यात आदिवासी अभिमान, विकास प्रवास आणि लोककल्याण यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
X वरील वेगवेगळ्या पोस्टमध्ये मोदी म्हणाले;
"आज, मी नवा रायपूर अटल नगर येथे छत्तीसगडच्या आदिवासी समुदायांच्या अदम्य साहस , त्याग आणि देशभक्तीला समर्पित आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन केले. संग्रहालयाला भेट देण्यासोबतच, मला शहीद वीर नारायण सिंह स्मारकाचे उद्घाटन आणि त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले. "
"नवा रायपूर अटल नगर येथील रौप्य महोत्सवी प्रदर्शनात छत्तीसगडच्या अडीच दशकांच्या विकास प्रवासाचे साक्षीदार होताना मला खूप आनंद होत आहे."
"छत्तीसगडमधील माझ्या गरीब बंधूभगिनींना भेटून मला खूप समाधान वाटले. या बंधूभगिनींना आता कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. त्यांच्या घरांच्या चाव्या मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता."
"छत्तीसगडच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या राज्यातील माझ्या कुटुंबातील सदस्यांचे खूप खूप अभिनंदन!
जय जोहार!”
"25 वर्षांपूर्वी छत्तीसगडच्या निर्मितीसह आदरणीय अटलजींनी पेरलेले बीज आता विकासाच्या वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. या काळात, येथील माझ्या बंधू आणि भगिनींनी अनेक उपलब्धी साध्य करून दाखवल्या आहेत , त्याचा मला अभिमान आहे!"
"छत्तीसगडमधील आपल्या आदिवासी समुदायाने भारताच्या वारसा आणि विकासात अतुलनीय योगदान दिले आहे. आज उद्घाटन झालेले त्यांना समर्पित शहीद वीर नारायण सिंह स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील."
"अकरा वर्षांपूर्वी, आपण छत्तीसगड आणि संपूर्ण देशाला नक्षलवादी आणि माओवादी दहशतवादापासून मुक्त करण्याचे वचन दिले होते, ज्याचे परिणाम आज संपूर्ण देश पाहत आहे. मला आनंद आहे की छत्तीसगडच्या त्या भागातही विकासाचा प्रवाह वाहत आहे जिथे दशकांपासून दहशतीचा वेढा होता."
***
सुषमा काणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
(Release ID: 2185424)
Visitor Counter : 5