पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रधानमंत्री यांनी नवा रायपूर येथील छत्तीसगड विधानसभेच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटनावेळी केलेल्या भाषणाची क्षणचित्रे केली सामायिक

Posted On: 01 NOV 2025 4:15PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा रायपूर येथील छत्तीसगड विधानसभेच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटन समारंभात केलेल्या भाषणाची काही क्षणचित्रे समाज माध्यमावर सामायिक केली आहेत.

​या संदर्भात X या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी स्वतंत्रपणे सामायिक केलेले संदेश:

आज छत्तीसगड विधानसभेच्या भव्य आणि आधुनिक नवीन इमारतीसोबतच श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयींच्या प्रतिमेचेही अनावरण झाले, अशावेळी मनात याच भावना आहेत...

​मला विश्वास आहे की डिजिटल सुविधांनी सुसज्ज छत्तीसगड विधानसभेची नवीन इमारत आगामी दशकांमध्ये राज्याचे धोरण, भविष्य आणि धोरणकर्त्यांचे एक महत्त्वाचे केंद्र बनेल. इथे घेतलेले निर्णय छत्तीसगडचे भविष्य घडवतील.

मला आनंद आहे की ज्याप्रमाणे आपल्या नवीन संसदेतील प्रदर्शिका भारताच्या लोकशाहीला प्राचीनतेशी जोडतात, त्याचप्रमाणे छत्तीसगड विधानसभेच्या नवीन इमारतीमध्येही वारसा आणि विकासाचा एक अनोखा मिलाफ घडून आला आहे.

नागरिक देवो भवः हाच आपल्या सुशासनाचा मंत्र आहे. म्हणूनच इथे आपल्याला सुधारणांना गती देऊ शकतील, तसेच जनता-जनार्दनाचे जीवन अधिकाधिक सुलभ करू शकतील अशा कायद्यांवर भर द्यायचा आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या वेळी आपण सर्वांनी देव ते देश आणि राम ते राष्ट्र असा संकल्प केला होता. त्यांचे आजोळ असलेल्या छत्तीसगडमध्येही आपल्याला त्यांचे आदर्श प्रत्यक्षात साकार करायचे आहेत.

***

माधुरी पांगे/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2185257) Visitor Counter : 12