पंतप्रधान कार्यालय
लखनौ शहराला युनेस्कोच्या खाद्यपरंपरेतील नवोन्मेषी शहर म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
Posted On:
01 NOV 2025 2:13PM by PIB Mumbai
लखनौला युनेस्कोच्या खाद्यपरंपरेतील नवोन्मेषी शहर म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. लखनौ म्हणजे उत्साही संस्कृतीचे प्रतीक असून एक समृद्ध खाद्य परंपरा त्याच्या केंद्रस्थानी आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. युनेस्कोच्या या मान्यतेमुळे शहराचा हा वैशिष्ट्यपूर्ण पैलू अधोरेखित झाल्याचे मोदी यांनी नमूद केले. जगभरातील लोकांनी लखनौला भेट द्यावी आणि तिथले हे वैशिष्ट्य अनुभवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
या घडामोडीबाबत सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या संदेशाला प्रतिसाद देताना मोदी यांनी ‘X या सामाजिक माध्यमांवरील लिहिले की,
‘लखनौ आपल्या उत्साही संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्या संस्कृतीच्या केंद्रस्थानी अप्रतिम अशी खाद्यपरंपरा आहे. युनेस्कोने लखनौच्या या पारंपरिक वैशिष्ट्याला मान्यता दिल्याबद्दल मला आनंद झाला आहे. मी जगभरातील लोकांना आवाहन करतो की त्यांनी लखनौला भेट द्यावी आणि तेथील हे वैशिष्ट्य अनुभवावे.’
***
माधुरी पांगे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2185216)
Visitor Counter : 14