पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त भारत त्यांना आज आदरांजली अर्पण करत आहे : पंतप्रधान
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                31 OCT 2025 7:40PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2025
 
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशे व्या जयंतीनिमित्त भारत त्यांना आज आदरांजली अर्पण करत आहे,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेल्या वारशाचा सन्मान करताना पंतप्रधान म्हणाले, की सरदार पटेल हे भारताच्या एकात्मतेमागील प्रेरक शक्ती होते आणि त्यांनी देशाच्या निर्मितीच्या काळात देशाचे भवितव्य घडवण्यात निर्णायक भूमिका बजावली. राष्ट्राची अखंडता, सुशासन आणि सार्वजनिक सेवेसाठी सरदार पटेल यांनी दर्शविलेली अढळ वचनबद्धता अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
सरदार पटेल यांच्या अखंड, सामर्थ्यशाली आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाचे समर्थन करण्याच्या देशाच्या सामूहिक संकल्पाचा पंतप्रधानांनी यावेळी पुनरुच्चार केला.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भारत त्यांना आज आदरांजली वाहत आहे. अखंड भारतामागील  प्रेरक शक्ती होऊन त्यांनी सुरुवातीच्या काळात आपल्या देशाचे भवितव्य घडवले. राष्ट्रीय अखंडता, सुशासन आणि सार्वजनिक सेवेप्रती असलेली  त्यांची अढळ वचनबद्धता अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. एकसंध, सामर्थ्यशाली आणि आत्मनिर्भर भारताचे त्यांचे स्वप्न कायम ठेवण्याचा आमचा सामूहिक संकल्प आम्ही पुन्हा एकदा दृढ करतो.
 
 
* * *
सोनल तुपे/संपदा पाटगावकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2184841)
                Visitor Counter : 4
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam