इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने 'आधार दृष्टिकोन 2032' आराखड्याचे केले अनावरण; कृत्रिम प्रज्ञा, ब्लॉकचेन, क्वांटम कम्प्युटिंग आणि प्रगत एन्क्रिप्शनद्वारे भविष्यात डिजिटल ओळख सुरक्षित करण्याचा उद्देश
Posted On:
31 OCT 2025 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2025
तंत्रज्ञान आणि नियामक परिदृष्टात वेगाने होणारे बदल लक्षात घेऊन भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) आगामी दशकात आधारच्या विकासासाठी एक व्यापक धोरणात्मक आणि तांत्रिक पुनरावलोकन प्रक्रिया सुरू केली आहे. या अंतर्गत 'आधार दृष्टिकोन 2032' हा नवीन आराखडा तयार करण्यात येत आहे.
आधार दृष्टिकोन 2032
हा भविष्योन्मुख आराखडा आधारचा तांत्रिक पाया मजबूत करेल, उदयोन्मुख डिजिटल नवोन्मेषाला एकत्रित करेल तसेच भारताची डिजिटल ओळख प्रणाली सक्षम, समावेशक आणि भविष्यासाठी तयार राहील याची खात्री करेल. आधार सेवांचा कणा असलेले आणि आपल्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे प्रमुख साधन म्हणून काम करणारे ‘यूआयडीएआय’चे तंत्रज्ञान व्यासपीठ मोठे तांत्रिक सुधार घडवण्यासाठी सज्ज आहे.
‘यूआयडीएआय’ने या महत्त्वाकांक्षी परिवर्तनाला दिशा देण्यासाठी ‘यूआयडीएआय’चे अध्यक्ष नीलकंठ मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय तज्ञ समिती स्थापन केली आहे. या समितीत शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्र तसेच प्रशासनातील नामांकित तज्ञ आणि नेते सहभागी आहेत. ही समिती आधारच्या नवोन्मेष आराखड्याला बळकट करण्यासाठी धोरणात्मक सल्ला देईल.
ही समिती आधार दृष्टिकोन 2032 दस्तऐवज विकसित करेल, ज्यामध्ये भारताच्या डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण (डीपीडीपी) कायद्याशी तसेच गोपनीयता आणि सायबर सुरक्षेच्या उदयोन्मुख जागतिक मानकांशी सुसंगत पुढील पिढीच्या आधार रचनेचा आराखडा मांडला जाईल.
आधार दृष्टिकोन 2032 आराखड्यात, कृत्रिम प्रज्ञा, ब्लॉकचेन, क्वांटम कम्प्युटिंग, प्रगत एन्क्रिप्शन आणि पुढील पिढीतील डेटा सुरक्षा यंत्रणा यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करेल. आधार प्रणाली काळानुसार विकसित होणाऱ्या सायबरसुरक्षा धोक्यांसमोर मजबूत राहील, भविष्यातील मागणीनुसार विस्तारक्षम असेल आणि वेगाने बदलणाऱ्या डिजिटल परिदृश्याशी जुळवून घेणारी असेल.
या उपक्रमाद्वारे, ‘यूआयडीएआय’ने भारताच्या डिजिटल प्रशासन प्रवासात आधार एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून कायम राहील याची खात्री करून तांत्रिक उत्कृष्टता, नवोन्मेष आणि सार्वजनिक विश्वासासाठी आपली वचनबद्धता पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. आधार दृष्टिकोन 2032 आराखडा केवळ तांत्रिक नेतृत्व टिकवून ठेवण्याबद्दल नाही तर आधारला सुरक्षित, सर्वसमावेशक आणि नागरिक केंद्रित डिजिटल ओळख प्रणाली म्हणून मजबूत करण्याबद्दल देखील आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2184801)
Visitor Counter : 20