शिक्षण मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        सर्व शाळांमध्ये इयत्ता तिसरीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेवरील अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार
                    
                    
                        
कृत्रिम बुद्धिमत्तेतील शिक्षणाकडे  आपल्या सभोवतालच्या जगाशी जोडलेले मूलभूत सार्वत्रिक कौशल्य म्हणून पाहिले जावे  - सचिव, शालेय शिक्षण
                    
                
                
                    Posted On:
                30 OCT 2025 8:48PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2025
 
शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने भविष्यासाठी सज्ज शिक्षणाचे आवश्यक घटक म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग (AI आणि CT) यांना चालना देण्याप्रति आपल्या वचनबद्धतेला दुजोरा दिला आहे. विभाग राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबरच सीबीएसई, एनसीईआरटी, केव्हीएस आणि एनव्हीएस सारख्या संस्थांना राष्ट्रीय शालेय शिक्षण अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF SE) 2023 च्या विस्तृत कक्षेत सल्लागार प्रक्रियेद्वारे अर्थपूर्ण आणि समावेशक अभ्यासक्रम तयार करण्यास मदत करत आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग (एआय आणि सीटी) यामुळे शिकणे, विचार करणे आणि शिकवणे या संकल्पनेला बळकटी देईल आणि हळूहळू "सार्वजनिक हितासाठी एआय" या कल्पनेकडे त्याचा विस्तार होईल. हा उपक्रम जटिल आव्हाने सोडवण्यासाठी एआयच्या नैतिक वापराच्या दिशेने एक नवीन परंतु महत्त्वपूर्ण पाऊल आहे, कारण तंत्रज्ञानाची सुरुवात इयत्ता 3 री  पासून पायाभूत टप्प्यापासूनच केली जाईल.
29 ऑक्टोबर 2025 रोजी हितधारकांसमवेत सल्लामसलत बैठक झाली , ज्यामध्ये सीबीएसई, एनसीईआरटी, केव्हीएस, एनव्हीएस आणि बाह्य तज्ञांसह विविध तज्ञ संस्था एकत्र आल्या होत्या . केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) एआय आणि सीटी अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी आयआयटी मद्रासचे प्रा. कार्तिक रमण यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती स्थापन केली आहे.

या सल्लामसलत बैठकीत बोलताना, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेतील शिक्षणाकडे  आपल्या सभोवतालच्या जगाशी जोडलेले मूलभूत सार्वत्रिक कौशल्य म्हणून पाहिले जावे यावर भर दिला. अभ्यासक्रम व्यापक, समावेशक आणि राष्ट्रीय शालेय शिक्षण अभ्यासक्रम फ्रेमवर्क 2023 शी सुसंगत असावा तसेच प्रत्येक मुलाची विशिष्ट क्षमता ही आमची प्राथमिकता आहे असे त्यांनी नमूद केले. धोरणकर्ते म्हणून आमचे काम किमान मर्यादा निश्चित करणे आणि बदलत्या गरजांनुसार त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आहे  असे त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे अधोरेखित केले की शिक्षक प्रशिक्षण आणि शिक्षण-अध्यापन सामग्री, ज्यामध्ये NISHTHA चे शिक्षक प्रशिक्षण मॉड्यूल आणि व्हिडिओ-आधारित शिक्षण संसाधने यांचा समावेश आहे, ते अभ्यासक्रम अंमलबजावणीचा कणा बनतील. राष्ट्रीय शालेय शिक्षण अभ्यासक्रम फ्रेमवर्क अंतर्गत समन्वय समितीच्या माध्यमातून एनसीईआरटी आणि सीबीएसई यांच्यातील सहकार्यामुळे अखंड एकात्मता, रचना आणि गुणवत्ता हमी सुनिश्चित होईल. आंतरदेशीय  आणि आंतरराष्ट्रीय बोर्ड विश्लेषण असणे आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन असणे चांगले आहे, परंतु ते आपल्या गरजांनुसार विशिष्ट असले पाहिजे यावर कुमार यांनी  भर दिला.
सहसचिव (माहिती आणि तंत्रज्ञान) प्राची पांडे यांनी समारोप करताना अभ्यासक्रम विकास आणि अंमलबजावणीसाठी निश्चित वेळेचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
महत्त्वाचे निर्णय
	- 2026–27 शैक्षणिक सत्रापासून इयत्ता तिसरी पासून एनईपी  2020 आणि एनसीएफ एसई 2023 ला अनुरूप कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग ची ओळख करून दिली जाईल.
- एनसीएफ एसई अंतर्गत एआय आणि सीटी अभ्यासक्रम, वेळेची विभागणी  आणि संसाधनांचे एकत्रीकरण केले जाईल .
- डिसेंबर  2025 पर्यंत संसाधन साहित्य, हँडबुक आणि डिजिटल संसाधनांचा विकास.
- NISHTHA  आणि इतर संस्थांद्वारे शिक्षक प्रशिक्षण, जे ग्रेड-निहाय  आणि वेळेनुसार डिझाइन केले आहे.
 
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2184398)
                Visitor Counter : 13