पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी 18 व्या आशिया-प्रशांत परिषदेतील जर्मन व्यवसायासंबंधित केलेल्या बीजभाषणाचा मराठी अनुवाद (एपीके 2024)
प्रविष्टि तिथि:
25 OCT 2024 2:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2024
महामहिम अध्यक्ष स्कोल्झ,
उपाध्यक्ष डॉ. रॉबर्ट हॅबेक,
भारत सरकारचा मंत्रीगट,
आशिया-प्रशांत परीषदेच्या जर्मन उद्योग समितीचे अध्यक्ष डॉ. बुश,
आशिया -प्रशांत देशांतील तसेच जर्मनी,भारत या देशांतील उद्योग क्षेत्रातील नेते,
बंधु आणि भगिनींनो
नमस्कार
गुटेन टॅग!
मित्रांनो,,
आजचा दिवस हा अगदी खास दिवस आहे.माझे सुह्रुद, चांसलर स्कोल्झ, चौथ्यांदा भारतात आले आहेत.
प्रथम झालेल्या दौऱ्याच्यावेळी ते महापौर या नात्याने उपस्थित होते आणि पुढील तीन दौरे त्यांनी त्यांच्या चान्सेलर या कार्यकाळात केले आहेत, यावरून भारत-जर्मनी संबंधावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.
जर्मन उद्योगांसंदर्भातील आशिया-पॅसिफिक परिषद 12 वर्षांनंतर भारतात आयोजित केली जात आहे
एकीकडे, प्रमुख कार्यकारी अधिकारी मंचाची बैठक होत आहे आणि दुसरीकडे, उभय देशांची नौदले एकत्र सराव करत आहेत. जर्मन नौदल जहाजे सध्या गोवा बंदरात आहेत. याव्यतिरिक्त, भारत आणि जर्मनी यांच्यातील सातवे आंतर-शासकीय चर्चासत्र लवकरच आयोजित होणार आहे.
भारत आणि जर्मनीमधील मैत्री प्रत्येक पावलावर, प्रत्येक आघाडीवर अधिक दृढ होत आहे,हे यातून स्पष्टपणे दिसून येत आहे
मित्रांनो,
यंदाच्या वर्षी भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत.
पुढील 25 वर्षांत या भागीदारीने नवी उंची गाठलेली आपल्याला दिसेल.
भारताच्या विकासाच्या पुढील 25 वर्षांचा एक आराखडा आम्ही तयार केला आहे.
अशा महत्त्वाच्या वेळी, जर्मन मंत्रिमंडळाने "भारतावरील लक्ष केंद्रित करा" असे परीपत्रक प्रसिद्ध केले आहे, याचा मला आनंद होत आहे.
आपण जगातील दोन सर्वात मजबूत लोकशाही देश आहोत,जगातील दोन आघाडीच्या अर्थव्यवस्था एकत्रितपणे जागतिक हितासाठी एक शक्ती होऊ शकतात फोकस ऑन इंडिया याविषयीचा एक आराखडा प्रदान करु शकतो. यातून, जर्मनीचा समग्र दृष्टिकोन आणि धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्याची वचनबद्धता स्पष्टपणे दिसून येते. जर्मनीने भारताच्या कुशल कामगारांवर व्यक्त केलेला विश्वास ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.
कुशल भारतीयांसाठी व्हिसाची संख्या दरवर्षी 20,000 वरून 90,000 पर्यंत वाढवण्याचा निर्णय जर्मनीने घेतला आहे.
यामुळे जर्मनीच्या आर्थिक विकासाला अधिक चालना मिळेल,असा विश्वास मला वाटतो.
मित्रांनो,
आमचा द्विपक्षीय व्यापार 30 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे.
आज, शेकडो जर्मन कंपन्या भारतात कार्यरत असताना, भारतीय कंपन्या देखील जर्मनीमध्ये वेगाने विस्तारत आहेत.
मित्रांनो,
भारत विविध जोखीममुक्त व्यवहारांचे एक प्रमुख केंद्र बनत आहे तसेच विकास आणि उत्पादनांचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे.या पार्श्वभूमीवर तुमच्यासाठी ही वेळ, भारतासाठी आणि जगासाठी मिळत असलेली सर्वात सुयोग्य संधी आहे.
मित्रांनो,
आशिया-प्रशांत परिषदेने युरोपियन युनियन आणि आशिया-प्रशांत प्रदेशातील संबंध मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु मला हे व्यासपीठ केवळ व्यापार आणि गुंतवणूकीपुरतेच मर्यादित आहे असे वाटत नाही.
मी याला भारत-प्रशांत (इंडो-पॅसिफिक) क्षेत्रासाठी केलेला सहयोग आणि जगाचे चांगले भविष्य या दृष्टिकोनातून पाहतो. जगाला स्थिरतेची, शाश्वतीची, विश्वास आणि पारदर्शकतेची आवश्यकता आहे. समाजात असो किंवा पुरवठा साखळीत असो, प्रत्येक आघाडीवर या मूल्यांवर भर दिला पाहिजे. त्यांच्याशिवाय कोणताही देश किंवा प्रदेश उज्ज्वल भविष्याची कल्पना करू शकत नाही.
जगाच्या भविष्यासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतिक विकास, लोकसंख्या किंवा कौशल्य कोणत्याही बाबतीत असो, या प्रदेशाचे योगदान आणि क्षमता प्रचंड आहेत.म्हणून, या परिषदेचे महत्त्व आणखी अधिक आहे.
मित्रांनो,
भारतातील लोक स्थिर राजकारण आणि निश्चित धोरणात्मक परिसंस्थेला महत्त्व देतात.
म्हणूनच, 60 वर्षांनंतर, सलग तिसऱ्यांदा आमचे सरकार निवडून आले आहे. गेल्या दशकातील सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनकारी प्रशासनामुळे भारतात हा विश्वास अधिकच दृढ झाला आहे.
तुमच्यासारखे व्यावसायिक आणि गुंतवणूकदार यापेक्षा चांगले दुसरे कुठे असतील?असे भारतातील सर्वसामान्य नागरिकाला वाटते.
मित्रांनो,
लोकशाही, लोकसंख्याशास्त्र, मागणी आणि माहिती:या चार मजबूत स्तंभांवर भारत उभा आहे प्रतिभा, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि पायाभूत सुविधा ही भारताच्या विकासाची साधने आहेत. आज,आकांक्षी भारताची ताकद: ही एक अतिरिक्त मोठी शक्ती या सर्वांमागे आहे.
एआय - कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आकांक्षी भारत यांची एकत्रित शक्ती आपल्यासोबत आहे. आपले तरुण आकांक्षी भारत मोहीम चालवत आहेत.
गेल्या शतकात, नैसर्गिक संसाधनांनी विकासाला गती दिली होती. या शतकात, मानवी संसाधने आणि नवोपक्रम हे विकासाला चालना देतील. म्हणूनच भारत आपल्या युवावर्गासाठी कौशल्ये आणि तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यास वचनबद्ध आहे.
मित्रांनो,
जगाच्या भविष्यातील गरजांसाठी,भारत आज काम करत आहे. मग ते मिशन एआय असो,
आमचे सेमीकंडक्टर मिशन असो,
क्वांटम मिशन,
मिशन ग्रीन हायड्रोजन
वा अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित मिशन असो किंवा डिजिटल इंडिया मिशन, या सर्वांचा उद्देश जगाला सर्वोत्तम आणि सर्वात विश्वासार्ह उपाय प्रदान करणे हा आहे. ही क्षेत्रे तुम्हा सर्वांना असंख्य गुंतवणूक आणि सहकार्याच्या संधी उपलब्ध करून देत आहेत.
मित्रांनो,
भारत प्रत्येक नवोन्मेषासाठी एक मजबूत व्यासपीठ आणि सर्वोत्तम पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. आमची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा नवीन स्टार्टअप्स आणि उद्योग 4.0 या साठी अनंत संधी निर्माण करत आहे. भारत रेल्वे, रस्ते, विमानतळ आणि बंदरांमध्ये विक्रमी गुंतवणूक करून आपल्या भौतिक पायाभूत सुविधांमध्येही बदल करत आहे. जर्मनी आणि भारत-प्रशांत (इंडो-पॅसिफिक) प्रदेशातील कंपन्यांसाठी येथे व्यापक संधी आहेत.
भारत आणि जर्मनी अक्षय ऊर्जेवर एकत्र काम करत आहेत याचा मला आनंद होत आहे.
गेल्या महिन्यात, जर्मनीच्या सहकार्याने गुजरातमध्ये चौथी जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
जागतिक स्तरावर अक्षय ऊर्जेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारत-जर्मनी असे व्यासपीठ देखील सुरू करण्यात आले आहे. भारत विकसित करत असलेल्या ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टमचा तुम्ही लाभ घ्याल,अशी आशा मला वाटते.
मित्रांनो,
भारताच्या विकासगाथेत सामील होण्याची हीच योग्य वेळ आहे.
जेव्हा भारताची गतिमानता आणि जर्मनीची अचूकता यांचे एकत्रिकरण होते आणि जर्मनीचे अभियांत्रिकी ज्ञान भारताच्या नवोन्मेषाला भेटते,जेव्हा जर्मनीचे तंत्रज्ञान भारताच्या प्रतिभेशी जुळते, तेव्हा इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि जगासाठी एका उज्ज्वल भविष्याची संकल्पना समोर उभी रहाते.
मित्रांनो,
तुम्ही उद्योग क्षेत्राशी संबंधित आहात.
"जेव्हा आपण भेटू तेव्हा आपला व्यवसाय करु” हा तुमचा मंत्र आहे."
पण भारतात येणे म्हणजे फक्त व्यवसाय करणे इतकेच नव्हे; जर तुम्ही भारताची संस्कृती पाहिली नाहीत,पाककृतींचा आस्वाद घेतला नाहीत आणि खरेदी केली नाहीत तर मोठ्या आनंदाला मुकाल.
मी तुम्हाला खात्री देतो: तुम्ही खूष व्हाल आणि मायदेशी परतल्यावर तुमच्या कुटुंबाला आणखी खूष कराल.
खूप खूप धन्यवाद,
ही परिषद आणि भारतातील तुमचे वास्तव्य फलदायी आणि संस्मरणीय होवो.
धन्यवाद.
* * *
नेहा कुलकर्णी/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2183895)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Assamese
,
Telugu
,
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam